महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदी तोडत टिकटॉकवर पोलिसांविषयी असभ्य भाषेत व्हिडिओ, डोंगरीतील दोघांना अटक

डोंगरी परिसरात राहणारे हसन शेख आणि आसिफ शेख या दोन तरुणांनी संचारबंदी असतानाही रस्त्यावर फिरत 'टिकटॉक' या सोशल माध्यमावर एक व्हिडिओ बनवत संचारबंदी आणि पोलिसांच्या विरोधात अर्वाच्य भाषेचा वापर केला होता.

By

Published : Apr 19, 2020, 10:11 AM IST

Updated : Apr 19, 2020, 4:10 PM IST

डोंगरीतील दोघांना अटक
डोंगरीतील दोघांना अटक

मुंबई -शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी संचारबंदी असून पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र, संचारबंदीचा कायदा मोडून सोशल माध्यमांवर पोलिसांना आव्हान देणाऱ्या 2 आरोपींना मुंबई पोलिसांच्या डोंगरी पोलीस ठाण्याने अटक केली आहे.

संचारबंदी तोडत टिकटॉकवर पोलिसांविषयी असभ्य भाषेत व्हिडिओ, डोंगरीतील दोघांना अटक

डोंगरी परिसरात राहणारे हसन शेख आणि आसिफ शेख या दोन तरुणांनी संचारबंदी असतानाही रस्त्यावर फिरत 'टिकटॉक' या सोशल माध्यमावर एक व्हिडिओ बनवत संचारबंदी आणि पोलिसांच्या विरोधात अर्वाच्य भाषेचा वापर केला होता. "ये अरबीयो का डोंगरी है बेटा, यहां शानपट्टी सिर्फ शानो पे जजती है, पुलीसवालों पे नहीं " अस म्हणत त्यांनी संचारबंदीला आव्हान दिले होते.

या नंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यावर डोंगरी पोलिसांनी या दोन्ही आरोपीना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. 'टिक टॉक' व्हिडिओत मुंबई पोलिसांना आव्हान देणाऱ्या आरोपीना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर हे दोन्ही आरोपी पोलिसांची माफी मागतानाही आणखी एका व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.

Last Updated : Apr 19, 2020, 4:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details