मुंबई- पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर सर्व भागातून मदत होत आहे. यात पूरबाधितांच्या मदतीसाठी मुस्लिम बांधवही सरसावले आहेत. उद्या होणाऱ्या बकरी ईदच्या निम्मित कुर्बानी मधील काही रक्कम पूरग्रस्तांना द्यावी असे आवाहन, राष्ट्र सेवा दलाचे मुंबईतील कार्यकर्ते निसार अली सय्यद यांनी केले होते. त्यानुसार मुस्लिम बांधव मदतीसाठी पुढे आले आहेत.
पूरबाधितांच्या मदतीसाठी मुस्लिम बांधव सरसावले - Nisar Ali Syed
बकरी ईदच्या कुर्बानीतील थोडी रक्कम बाजूला काढून ती कोल्हापूर, सांगलीमधील पूरबाधितांना द्यावी, असे सैय्यद यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी त्यांच्याकडे पूरबाधितांसाठी मदत पोहोचवली आहे.
पूर परिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतूक बंद असताना देखील मिरज येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करीत आहे. या मदतीत आपणही आपला खारीचा वाटा उचलावा. तसेच बकरी ईदच्या कुर्बानीतील थोडी रक्कम बाजूला काढून ती कोल्हापूर, सांगलीमधील पूरबाधितांना द्यावी, असे आव्हान आम्ही केले आहे. याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 15 मुस्लिम बांधवांनी माझ्याकडे पूरग्रस्तांसाठी मदत पोहचवली असल्याचे सय्यद यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर जिल्हा गेल्या आठवडाभरापासून पुराच्या पाण्याखाली गेला आहे. अद्यापही इथली स्थिती पूर्वपदावर आलेली नाही.