महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अ‌ॅमेझॉननंतर 'डॉमिनोज'ही मराठीचा वापर करणार, मनसेची मागणी मान्य - अ‌ॅमेझॉननंतर डॉमिनोज मराठी

डोमिनोज पिझ्झाने त्यांची मागणी मान्य करत अ‌ॅपमध्ये मराठीचा समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे. अमेझॉन कंपनीशी लढाई जिंकल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पिझ्झा कंपनीमध्ये अग्रेसर असणाऱ्या डोमिनोज पिझ्झाकडे लक्ष्य केंद्रित केल होते.

डॉमिनोज
डॉमिनोज

By

Published : Dec 31, 2020, 4:12 PM IST

मुंबई- अमेझॉन कंपनीशी लढाई जिंकल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पिझ्झा कंपनीमध्ये अग्रेसर असणाऱ्या डोमिनोज पिझ्झाकडे लक्ष्य केंद्रित केल आहे. 'मराठी नाही तर डोमिनोज पिझ्झा नाही', ही मोहीम मनसेच्या मुनाफ ठाकूर यांनी सुरू केली होती. डोमिनोज पिझ्झाने त्यांची मागणी मान्य करत अ‌ॅपमध्ये मराठीचा समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे.

मुंबई
मनसेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांनी डोमिनोज पिझ्झा या आंतराष्ट्रीय अ‌ॅपमध्ये मराठीचा समावेश असावा यासाठी मागणी केली होते. अमेझॉननंतर कोणतीही कंपनी मनसेशी पंगा घेण्यास तयार नाही आहे. मागणी केल्यानंतर डोमिनोज पिझ्झा/ज्यूबिलंट फूडवर्क्स कंपनीचे कायदा प्रमुख संदीप मेहरा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून लवकरच मराठी भाषेचा समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
मराठीचीलढाई सुरूच राहील

काही दिवसांपूर्वी आम्ही डोमिनोज व्यवस्थापनला एक पत्र लिहले होते. त्या पत्रामध्ये तुमच्या अ‌ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश लवकरात-लवकर करावा, अशी मागणी केली होती. त्याच्यानंतर आमचा संवाद डोमिनोज व्यवस्थापनाबरोबर सुरू होता. आमची मागणी त्यांनी मान्य केली असून लवकरात-लवकर मराठीचा समावेश करू, असे आश्वासन दिले आहे. आमचा हा दुसरा विजय आहे, पुढे देखील ही लढाई सुरू राहील असेही ठाकूर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details