मुंबई Dominance Of Ajit Pawar Party :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे केलं होतं. (meeting of MLAs of all parties) या बैठकीला राज्यातील सत्ताधारी पक्षातील सर्वच घटक पक्ष, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, विरोधी पक्ष तसेच राज्यातील लहान मोठ्या पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. तसंच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेही बैठकीला हजर होते.
सहकार्य करण्याचं सर्व पक्षांचं मत :मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यावर सर्वच पक्षांचं एकमत झालं. त्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्रित येऊन सहकार्य करण्याचं ठरवलं. यासाठी सर्वपक्षीय ठराव करण्यात आला. यावेळी ठरावाच्या पत्रावर सगळ्याच पक्षांचे प्रमुख, प्रदेशाध्यक्ष, प्रतिनिधी यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि स्वाक्षरी केली आहे. ठरवाच्या पत्रात अनुक्रमांक, नाव, पक्ष आणि स्वाक्षरी अशा प्रकारचे रकाने करण्यात आले होते.
'दादा' पक्षाची चर्चा :पक्षाच्या रकान्यात 'दादा' आणि 'एनसीपी'चा उल्लेख दिसून आला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या नावापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लिहून स्वाक्षरी केली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या नावापुढे पक्षाच्या रकान्यात 'दादा' लिहून स्वाक्षरी केली आहे.
पुण्याचे पालकमंत्री पद पुन्हा अजित पवारांकडे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवसेना-भाजपासोबत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यामुळे शिंदे आणि भाजपातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यांना पालकमंत्री पदाचे स्वप्न पडू लागले होते. मात्र, इथेही अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांची दादागिरी भाजपा आणि शिंदे गटाने पाहिली आहे. महायुती सरकारमध्ये अजित पवार गटाला देखील पालकमंत्री पदाच्या वाटपात झुकतं माप देण्यात आलं आहे. यापूर्वी तीन वेळा अजित पवार पुण्याचे पालक मंत्री राहिलेले होते.