महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा फटका : देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 40 टक्क्यांनी घसरली

कोरोनामुळे गेल्या वर्षी हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मात्र,आता हवाई वाहतूक हळूहळू धावपट्टीवर येत असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा परिणाम दिसून येत आहेत. एप्रिलमध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या सुमारे 40 टक्यांनी घटली आहे.

विमान
विमान

By

Published : May 5, 2021, 3:22 PM IST

मुंबई -कोरोनामुळे गेल्या वर्षी हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मात्र,आता हवाई वाहतूक हळूहळू धावपट्टीवर येत असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला असून मार्च महिन्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या सुमारे 40 टक्यांनी घटली आहे.

देशांतर्गत विमान वाहतूक 64 टक्के

भारतासह संपूर्ण देशात गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे हवाई प्रवासी संख्येत मोठी घट झाली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा विमान कंपनीला झाले आहेत. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होताच. 25 मेपासून निर्बधांमध्ये काही शिथिलता दिल्यानंतर देशांतर्गत विमान वाहतुक सुरू करण्यात आली. सुरुवातीला 25-25 विमानं सेवा चालविण्यात आले. डिसेंबर महिन्यापासून हवाई प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात एकूण देशांतर्गत विमान वाहतूक 64 टक्के नोंदविण्यात आली होती. पण, मार्च महिन्यापासून काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ हाेऊ लागलेल्या प्रवासी संख्या राेडावली.

6 कोटी 13 लाख प्रवाशांनी हवाई

विमान वाहतुकीचा अभ्यास करणाऱ्या ‘आयसीआरए’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, मार्च 2021 मध्ये दिवसाला सरासरी 2 लाख 49 हजार प्रवासी देशांतर्गत विमान प्रवास करत हाेते. मात्र, एप्रिलपासून त्यात प्रवासी संख्येत घट होत गेली. एप्रिल महिन्यात सरासरी दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला. म्हणजेच मार्चच्या तुलनेत प्रवासी संख्या 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. 25 मे, 2020 पासून 30 एप्रिलपर्यंत 6 कोटी 13 लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. त्यासाठी 5 लाख 88 हजार 389 विमानांनी सेवा दिली.

हेही वाचा -आता 'तीच' गती पंतप्रधानानांनी मराठा आरक्षणाबद्दल दाखवावी - मुख्यमंत्री ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details