मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. असाच प्रकार आता पालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयातही होत असल्याचे एका व्हिडीओ द्वारे समोर आले आहे. या बाबत रुग्णालयाचे डिन यांच्या बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बरोबर संपर्क होवू शकला नाही.
धक्कादायक! केईएम रुग्णालयातही कोरोना मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार? - kem hospital latest news
महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. असाच प्रकार आता पालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयातही होत असल्याचे समोर आले आहे. या बाबत रुग्णालयाच्या डिन बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकलेला नाही.
सायन रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. या व्हिडिओ प्रकरणी रुग्णालयाचे डीन डॉ. इंगळे यांची बदली करून त्यांच्या जागी नायर रुग्णालयाचे माजी डीन डॉ. भारमल यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकारानंतर कोरोनाचे मृतदेह जास्त वेळ वॉर्डमध्ये ठेवू नये, ते मृतदेह ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था शवागृहात करावी असे आदेश देण्यात आले.
यानंतर आता पालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयात वॉर्ड क्रमांक २० ए मध्ये मृतदेहांशेजारीच कोरोना रूग्णांवर उपचार सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकारही एका व्हिडिओद्वारे समोर आला आहे. या वॉर्डमध्ये कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे केईएम रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सायन रुग्णालयाप्रमाणे केईएमच्या डीनवरही कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकलेला नाही.