मुंबई - लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे आज देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. या बंदमध्ये राज्यभरातील ४५ हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.
देशभरातील डॉक्टर आज संपावर; आयएमएने पुकारला बंद - नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक
लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे आज देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यास मान्यता देणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाला आयएमएने विरोध दर्शविला आहे.
यात रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा आणि रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांवर आंदोलनाचा कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यांना योग्य प्रकारे उपचार पद्धती सुरू राहणार आहेत असे डॉक्टरांनी सांगितले.
या आंदोलनाला महाराष्ट्रातील 45 हजार डॉक्टर सहभागी असणार आहेत. प्रस्तावित प्रक्रियेपासून या विधेयकाला वैद्यकीय क्षेत्रातून कडाडून विरोध होत आहे. याआधीही आंदोलने करण्यात आली होती .या विधेयक मंजूर झाल्यानंतर इ आय एम च्या देशभरातील विविध शाखांमध्ये निदर्शने सुरू होती. मात्र, डॉक्टरांच्या निदर्शनाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याची वेळ आली. त्यामुळे देशभरातील डॉक्टरांनी आज नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात आंदोलन केले आहे असे डॉक्टरांनी सांगितले.