मुंबई - 1 जुलै हा दिवस भारतात 'डॉक्टर्स डे' म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंता देशावर कॊरोना महामारीचे संकट असून हजारो डॉक्टर जिवाची बाजी लावत कॊरोनाशी दोन हात करत आहेत. या महामारीला हद्दपार करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यात देशातील अनेक डॉक्टर कॊरोनाच्या लढाईत शहीद झाले आहेत. एकूणच ही परिस्थिती पाहता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), महाराष्ट्रने हा दिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा दिवस 'आत्मसन्मान' दिवस म्हणून पाळला जाणार आहे. त्यानुसार ते बुधवारी आपल्या विविध मागण्या सरकारसमोर ठेवणार आहे.
उद्याचा 'डॉक्टर्स डे' आत्मसन्मान दिवस म्हणून पाळणार - आयएमए - १ जुलै डॉक्टर्स डे
भारतरत्न डॉ. बिधान चंद्र रॉय याच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1991 पासून भारतात 1 जुलै हा दिवस 'डॉक्टर्स डे' म्हणून पाळला जातो. दरवर्षी देशभरात आयएमएकडून या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. अशा परिस्थितीत हा दिन साजरा न करता तो आम्ही आत्मसन्मान दिन म्हणून साजरा करणार आहोत, अशी माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
आयएमएचे संस्थापक, प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. बिधान चंद्र रॉय याच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1991 पासून भारतात 1 जुलै हा दिवस 'डॉक्टर्स डे' म्हणून पाळला जातो. दरवर्षी देशभरात आयएमएकडून या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. आज डॉक्टर हेच देशाच्या केंद्रस्थानी असून तेच सध्या देवदूत आहेत. असे असतानाही त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. त्यातच शेकडो डॉक्टर कॊरोनाचे शिकार होत आहेत. आयएमएच्या 15 हून अधिक डॉक्टरांचा आतापर्यंत कॊरोनाने मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत हा दिन साजरा न करता तो आम्ही आत्मसन्मान दिन म्हणून साजरा करणार आहोत, अशी माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
कोविडच्या संकटात डॉक्टर लढत असताना त्यांना अनेक ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळत आहे. डॉक्टरांना घरे खाली करावी लागत आहेत. त्याचवेळी कित्येक डॉक्टर पीपीइ किट मिळत नसतानाही रुग्णसेवा करत कॊरोनाग्रस्त होत आहेत. दुसरीकडे जाचक अटीखाली डॉक्टरविरोधात कारवाई होत आहेत, अशा अनेक अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर सरकारी, पालिका डॉक्टरांना 50 लाखांचा विमा आहे. पण आम्ही खासगी डॉक्टरही जीवाची बाजी लावत असताना आम्हाला मात्र विमा नाही. तेव्हा 50 लाख विम्यासह अन्य मागण्या उद्या 'डॉक्टर्स डे'च्या निमित्ताने सरकारकडे ठेवल्या जाणार आहेत.