महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Doctors Beaten In Yavatmal: यवतमाळमध्ये डॉक्टरांना मारहाण, मुंबई पालिका रुग्णालयात काळया फिती लावून निषेध - डॉक्टरांना मारहाण

यवतमाळ वसंतराव नाईक रुग्णालयातील शत्रक्रिया विभागात रुग्णाला (Doctors beaten in Yavatmal) तपासण्यासाठी आलेल्या एका डॉक्टरच्या चेहऱ्यावर चाकूने हल्ला (knife Attack on Doctor) केला. दुसरा डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी आला असता त्याच्याही बोटाला दुखापत (Doctor injured) झाली आहे. (Mumbai Crime) मात्र सरकारने या घटनेविरुद्ध कोणतीही पाऊले उचलली नाहीत. (Mumbai Crime) आज पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काळया फिती लावून (Doctor protests by wearing black ribbons) या घटनेचा निषेध नोंदवला आहे. (Latest news from Mumbai)

Doctors Beaten In Yavatmal
मुंबई पालिका रुग्णालयात काळया फिती लावून निषेध

By

Published : Jan 6, 2023, 9:06 PM IST

मुंबई :यवतमाळ वसंतराव नाईक रुग्णालयात दोन डॉक्टरांना मारहाण करत (Doctors beaten in Yavatmal) रुग्णांने त्यांच्यावर चाकूने हल्ला (knife Attack on Doctor) केला आहे. या घटनेत दोन डॉक्टर जखमी (Doctor injured) झाले आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime) या घटनेचा निषेध म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या के ई एम, सायन, नायर, कूपर या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त (Doctor protests by wearing black ribbons) केला असल्याची माहिती पालिका मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ढगे यांनी दिली. (Latest news from Mumbai)

तपासायला आलेल्यावर चाकूहल्ला :यवतमाळ वसंतराव नाईक रुग्णालयातील शत्रक्रिया विभागात काल रात्री दोन निवासी डॉक्टर राऊंड घेत असताना त्यांना एक रुग्ण फळे कापायचा चाकू घेवून वार्डमध्ये मध्ये दिसला. डॉक्टरांना त्या रुग्णाने तुम्हाला फळे खायची आहेत का असा प्रश्न विचारला. डॉक्टरांनी त्याला नकार दिला. काही वेळाने डॉक्टर त्या रुग्णाला तपासण्यासाठी आले असता त्याने एका डॉक्टरच्या चेहऱ्यावर चाकूने हल्ला केला. दुसरा डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी आला असता त्याच्याही बोटाला दुखापत झाली आहे.


काळया फिती लावून निषेध :डॉक्टरांवर हल्ला झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही एम बी बी एस विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला झाला होता. आम्ही राज्य सरकारला रुग्णालयातील सुरक्षा वाढवण्याची विनंती केली होती. मात्र सरकारने कोणतीही पाऊले उचलली नाहीत. आज पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काळया फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवला आहे अशी माहिती डॉ. ढगे यांनी दिली.


नुकताच डॉक्टरांनी केला होता संप :राज्यभरातील निवासी डॉक्टर सोमवार २ जानेवारीपासून आपल्या विविध मागण्यासाठी संपावर गेले होते. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागण्या मान्य करण्यासाठी पालिकेला दोन दिवसाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. संप मागे घेतल्यानंतर दोनच दिवसात यवतमाळ येथील घटना घडल्याने डॉक्टरांकडून घटनेचा निषेध केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details