महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coroanavirus : सेफ्टी किट नसल्याने मुंबईत डॉक्टरांचे कामबंद आंदोलन - शताब्दी रूग्णालय

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात होते. रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने आपल्या इतरही रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai
सेफ्टी किट नसल्याने मुंबईत डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

By

Published : Apr 4, 2020, 1:18 PM IST

मुंबई- कोरोना विषाणूची दहशत सर्वत्र पसरली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नसल्याने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी वॉर्डच्या बाहेर आहेत. तर खार येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

कोरोनाचे मुंबईत आतापर्यंत 306 रुग्ण आढळून आले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे 537 रुग्ण असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात होते. रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने आपल्या इतरही रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेने खासगी रुग्णालयेही ताब्यात घेतली असून त्यामध्येही उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या रुग्णालयात सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांची आहे. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला आहे. आधी सेफ्टी किट द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

तर खार येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उद्यापासून (रविवारी) कोरोनावर उपचार केले जाणार आहेत. मात्र, त्याठिकाणी सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. सेफ्टी किट दिले जाणार आहे की नाही, यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

सेफ्टी किट नसल्याने मुंबईत डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details