मुंबई-डॉक्टर पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, या मागणीसाठी आज नायर रुग्णालयाच्या बाहेर सामाजिक संस्थांनी निदर्शने केली. संबंधित आरोपींना नायर रुग्णालयातील प्रशासनाची फूस असून पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई का केली नाही? असा प्रश्नदेखील निदर्शन कर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कोणाचीही तक्रार आली नाही; नायर रुग्णालयाचा दावा - Payal Tadavi
यासंदर्भात नायर रुग्णालयाचे डीन डॉक्टर रमेश भरमल यांना विचारले असता, संबंधित आरोपींना लपवून ठेवण्यात माझा कोणताही हात नाही. प्रकरण सध्या पोलिसांकडे आहे. त्यामुळे या प्रकारावर जास्त बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आज नायर रुग्णालयाच्या बाहेर सामाजिक संस्थांनी निदर्शने केली.
यासंदर्भात नायर रुग्णालयाचे डीन डॉक्टर रमेश भरमल यांना विचारले असता, संबंधित आरोपींना लपवून ठेवण्यात माझा कोणताही हात नाही. प्रकरण सध्या पोलिसांकडे आहे. त्यामुळे या प्रकारावर जास्त बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित कुटुंबाची या प्रकरणासंबंधी कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही, असा दावाही डॉक्टर रमेश धर्म यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.