मुंबई :जगात अनेक पर्यटन स्थळे, वास्तू आणि जागतिक वारसा इत्यादी ( world Tourist destinations ) आहेत. जे त्यांच्या ऐतिहासिकतेचा, सौंदर्याचा आणि संस्कृतीचा प्रसार करत आहेत. त्याचप्रमाणे जगातील विविध देशांमध्ये असलेली सात आश्चर्ये जगप्रसिद्ध ( Seven Wonders of World ) आहेत. आज आपण त्याची माहिती घेणार आहोत.
ताजमहाल, भारत :जगातील सात आश्चर्यांपैकी आश्चर्य म्हणजे ताजमहाल. तो उत्तर प्रदेश राज्यात आहे. आग्रा शहरातील यमुना नदीच्या काठावर असलेला ताजमहाल ( Taj Mahal ) एक आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. ताजमहाल पांढऱ्या संगमरवरी दगडात बांघला गेला आहे. मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता. प्रेमाचे प्रतीक ( love symbol Taj Mahal ) असलेला ताजमहाल 20,000 कारागिरांनी बांधला होता. अशी रचना पुन्हा करता येऊ नये म्हणून त्यानंतर शाहजहानने कारागिरांची बोटे कापली होती असे सांगितले जाते.
ग्रेट वॉल ऑफ चायना :चीनची ग्रेट वॉल जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक ( Great Wall of China ) आहे. चीनची ही भिंत तिथले पहिले शासक किन शी हुआंग यांनी बांधली होती. इतिहासानुसार, 21,196 किमी लांबीची प्रचंड भिंत सुमारे 20 वर्षांत बांधली गेली. ही भिंत बांधण्याचे कारण म्हणजे हुआंग यांनी आपल्या साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी केले होते. चीनच्या ग्रेट वॉलला पृथ्वीवरील सर्वात लांब स्मशानभूमी देखील म्हटले जाते. या भिंतीच्या बांधकामादरम्यान 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
क्राइस्ट द रिडीमर, ब्राझील : क्राइस्ट द रिडीमर ब्राझीलमध्ये स्थित आहे. 125 फूट लांब, आहे. त्याला जे हेटर दा सिल्वा कोस्टा यांनी डिझाइन केले ( Christ the Redeemer ) होते. डोंगराच्या माथ्यावर वसलेली ही मूर्ती विजेला प्रवण असल्याचे मानले जाते. या मूर्तीवर वर्षातून तीन ते चार वेळा विजा पडतात, असे सांगितले जाते.