मुंबई- कोणाला एप्रिल फूल करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यावर पोलीस कारवाई होऊ शकते. आज 31 मार्च आहे, महिन्याचा शेवटचा दिवस. उद्या एप्रिल महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे परंपरेने लोक एकमेकांना एप्रिल फूल करत असतात. मात्र, यंदा आपल्या देशातवर संकट आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ठेवत कोणीही एकमेकांशी अफवा करून थट्टा करू नये, अन्यथा पोलीस कारवाई करतील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
'खबरदार, एप्रिल फूल कराल तर होणार पोलीस कारवाई' - अनिल देशमुख एप्रिल फूल न्यूज
एप्रिल फूल करत माध्यमावर कोणाचीही चेष्टा किंवा मस्करी करू नये, सरकारला सहकार्य करण्याचा सल्ला मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख
एप्रिल फूल करत माध्यमावर कोणाचीही चेष्टा किंवा मस्करी करू नये, सरकारला सहकार्य करण्याचा सल्ला मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. जो कोणी सहकार्य करणार नाही, त्याच्यावर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले.