मुंबई :धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करावे हे सर्वांनाच माहिती ( Dhantrayodashi ) आहे. परंतू या दिवशी काय खरेदी करू नये किंवा कोणत्या वस्तू खरेदी करू नये हे बहुतेकांना माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल ज्या विकत घेतल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे काय खरेदी करावे किंवा करू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंड, ॲल्यूमिनियम, स्टील, प्लास्टिक, सिरॅमिक किंवा काचेची भांडी खरेदी करू नयेत.
धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी करू नयेत :1. लोह हा शनीचा धातू आहे, तो आणल्याने अशुभ होते. 2. ॲल्यूमिनियम हा राहूचा धातू आहे, तो देखील अशुभ आणतो. 3. स्टील खरेदी केल्यानेही घरात गरिबी ( Do not buy metals ) येते. 4. प्लास्टिक खरेदी केल्याने आशीर्वाद कमी होतात. 5. काच ही राहूची वस्तू आहे. ज्यामुळे राहू घरात प्रवेश करतो आणि वातावरण देखील घरात शुभ राहत ( Things Should Not Be Done On Dhantrayodashi ) नाही.
जमीन, घर, धार्मिक साहित्य : त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी या 5 वस्तू खरेदी करणे टाळावे. जेणेकरून दुर्दैव नाहीसे होईल. चांगल्या गोष्टीत गुतवणूक ( Invest in good things on Dhantrayodashi ) करावी.या दिवशी तुम्ही पितळेची भांडी, धणे, सोने, चांदी, कपडे, झाडू, वाहन, नवीन पुस्तक खरेदी करू शकता. तुम्ही जमीन, घर, धार्मिक साहित्य, औषधे, खेळ इत्यादी खरेदी करून धनत्रयोदशीचे शुभकार्य शकता.