महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत छोटा राजनचा हस्तक डी.के. राववर न्यायालयातच हल्ला - crime

एका गुन्ह्यातील सुनावणीसाठी डी के राव व त्याचा साथीदार अनिल पाटील या दोघांना पोलिसांनी मुंबईतील सत्र न्यायालयात हजर केले असता डी के राव व अनिल पाटील या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

मुंबई न्यायालयात छोटा राजनचा हस्तक डी.के. रावला मारहाण

By

Published : Apr 9, 2019, 3:21 PM IST

Updated : Apr 9, 2019, 4:58 PM IST


मुंबई - कुख्यात गुंड व अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी के राव (दिलीप बोरा) याच्यावर त्याच्या साथीदाराने हल्ला चढवला. ही घटना मुंबईच्या सत्र न्यायालयाच्या आवारात घडली आहे.

एका गुन्ह्यातील सुनावणीसाठी डी के राव व त्याचा साथीदार अनिल पाटील या दोघांना पोलिसांनी मुंबईतील सत्र न्यायालयात हजर केले असता डी के राव व अनिल पाटील या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने डी के राव याने न्यायालयाच्या परिसरातून थेट न्यायाधीशांकडे पळ काढला. डी के राव याचा साथीदार अनिल पाटील याने त्याच्या कोर्टात आलेल्या साथीदारांच्या मदतीने डी के राव याला चोप दिला.

आपला बचाव करण्यासाठी डी. के. राव याने पोलीस बंदोबस्तात कोर्टातील न्यायाधीशांकडे धाव घेतली . दरम्यान डी के राव याच्यावर खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्नासारखे मकोका कायद्याखाली गंभीर गुन्हे दाखल असून छोटा राजन याचा खास हस्तक म्हणून त्याची अंडरवर्ल्ड मध्ये ओळख आहे.

Last Updated : Apr 9, 2019, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details