महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Diwali Muhurat Trading : लक्ष्मी पुजनानिमित्त शेअर मार्केटमध्ये 'या' वेळेत आज मुहूर्त ट्रेडिंग - Muhurat Trading

यंदा दिवाळी कोरोनामुक्त साजरी केली जाणार आहे. सर्वच सण यंदा कोरोनामुक्त साजरी होत आहेत. पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजार 1 तासासाठी सुरू असतो. शेअर बाजारात दिवाळीनिमित्ताने ट्रेडिंग करण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. त्या 1 तासाच्या ट्रेडिंगला 'मुहूर्त ट्रेडिंग' ( Muhurat Trading ) असे म्हणतात. या मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजारातील व्यवहार एक तासासाठी होतात. ही मुहूर्त ट्रेडिंग त्या दिवशी संध्याकाळी होते.

Diwali Share market
Diwali Share market

By

Published : Oct 19, 2022, 5:42 PM IST

Updated : Oct 24, 2022, 10:12 AM IST

मुंबई :यंदा दिवाळी कोरोनामुक्त साजरी केली जाणार आहे. सर्वच सण यंदा कोरोनामुक्त साजरी होत आहेत. पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आज शेअर बाजार 1 तासासाठी सुरू असतो. शेअर बाजारात दिवाळीनिमित्ताने ट्रेडिंग करण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. आज त्या 1 तासाच्या ट्रेडिंगला 'मुहूर्त ट्रेडिंग' ( Muhurat Trading ) असे म्हणतात. या मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजारातील व्यवहार एक तासासाठी होतात. ही मुहूर्त ट्रेडिंग आज दिवशी संध्याकाळी होते.

मुहूर्त ट्रेडिंगची जुनी परंपरा : मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा आज मुंबई शेअर मार्केटमध्ये 1957 ( Mumbai Stock Market ) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिनी अनेकजण शेअर खरेदी करण्यावर भर ( Emphasis buying share on Muhurat Trading ) देतात.लक्ष्मी पूजनाच्या दिवशी होणारी मुहूर्त ट्रेडिंग ही एक जुनी परंपरा आहे. पाच दशकांहून सुरू अधिक काळ सुरू असलेली ही जुनी परंपरा आहे.

एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग :आजलक्ष्मी पूजनाच्या दिवशी होणाऱ्या 1 तासाच्या ट्रेडिंगला 'मुहूर्त ट्रेडिंग' म्हणतात. आज मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक गुंतवणूकदार इक्विटी, इक्विटी फ्यूचर ॲण्ड ऑप्शन, करन्सी ॲण्ड कमोडिटी मार्केटमध्ये करतात. यंदा दिवाळी आज 24 आणि उद्या 25 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. मात्र आज 24 तारखेला संध्याकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान शेअर मार्केट ओपन होणार आहे. या एक तासाच्या कालावधीत मुहूर्त ट्रेडिंग केली जाणार आहे.

मुहूर्त ट्रेडिंग करणे शुभ :आज मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी ट्रे़डिंग करणे हे शुभ असल्याचे समजले ( Muhurat trading is auspicious ) जाते. या दिवशी ट्रेडिंग केल्याने समृद्धी येते आणि वर्षभर गुतंवणूकदारांकडे संपत्ती कायम येत राहते असे समजल्या जाते. आज मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी खरेदी करण्यात येणार शेअर्स अतिशय खास समजले जातात. त्यामुळे आज दिवाळीच्या दिवशी नवीन काम सुरू करणे हे शुभ असते अशी एक धारणा आहे.

Last Updated : Oct 24, 2022, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details