महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाल्यात पडलेल्या दिव्यांशचा शोध घेण्यासाठी 'सर्च ऑपरेशन' पुन्हा सुरू - open manhole

अग्निशमन दलाचे जवान पिरामल नगर येथील अनमोल टॉवर शेजारील नाल्यात शोध घेत आहेत. दिव्यांश नाल्यात पडल्याच्या घटनेला २४ तास उलटले आहेत. मात्र, अजुनही त्याचा शोध घेण्यात यश आले नाही.

रेस्क्यू ऑपरेशन

By

Published : Jul 12, 2019, 10:52 AM IST

मुंबई- बुधवारी रात्री नाल्यात पडलेल्या दिव्यांशचे आज (शुक्रवारी) सकाळपासून पुन्हा अग्निशमन दलाने 'सर्च ऑपरेशन' सुरू केले आहे. अग्निशमन दलाचे जवान पिरामल नगर येथील अनमोल टॉवर शेजारील नाल्यात शोध घेत आहेत. रात्री पडलेल्या पावसामुळे पुन्हा नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.

'रेस्क्यू ऑपरेशन' पुन्हा सुरु

शोधपथक मागील ३ तासांपासून नाल्यात उतरून दिव्यांशचा शोध घेत आहे. दिव्यांश नाल्यात पडल्याच्या घटनेला २४ तास उलटले आहेत. मात्र, अजुनही त्याचा शोध घेण्यात यश आले नाही. दिव्यांश सापडला नाही तर पुन्हा धरणे आंदोलन करण्याचा इशारा नातेवाईक आणि नागरिकांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details