महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारावीत युतीत बिघाडी : भाजपच्या दिव्या ढोले बंडखोरीच्या तयारीत - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

दिव्या ढोले या अनेक वर्षांपासून धारावी या ठिकाणी सामाजिक कार्य करत आहेत. मागील 2014 च्या निवडणुकीत दिव्या ढोले या यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

दिव्या ढोले

By

Published : Oct 1, 2019, 9:36 PM IST

मुंबई- धारावी या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे गेल्या 15 वर्षांपासून वर्चस्व आहे. तर 2014 ला काँग्रेसच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर दिव्या ढोले यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून या विभागात त्या बांधणी करत आहेत. मात्र, भाजप-सेना युती झाल्यावर हा मतदारसंघ सेनेला सुटला आणि ढोले यांची पंचायत झाली. मात्र, नाराज झालेल्या ढोले बंडखोरी करत इतर पक्षात किंवा अपक्ष उभे राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - विरोध करण्याचा अधिकार आहे, पण कोणाच्या मांडवात अडथळा आणू नका - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

दिव्या ढोले या अनेक वर्षांपासून धारावी या ठिकाणी सामाजिक कार्य करत आहेत. मागील 2014 च्या निवडणुकीत दिव्या ढोले या यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. या मतदारसंघात शिवसेनेचे 3 नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसैनिकांच्या मागणीनुसार हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेल्या ढोले या नाराज आहेत. त्यामुळे त्या बंड करतील अशी चर्चा सर्वत्र आहे. दिव्या ढोले या मुंबई भाजपच्या सचिव देखील आहेत.

हेही वाचा -धक्कादायक! शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाने घेतले पेटवून

या मतदारसंघात शिवसेनेकडून मनोहर रायबागे, राजेश खंदारे व बाबुराव माने हे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत. तर वंचित आघाडीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे दिव्या ढोले या वंचितमध्ये जातील की काय? अशी चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details