महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉक्टरच आले डॉक्टरांच्या मदतीला; नायर आणि बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाला पीपीई किटचे वाटप - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय

कोरोना रुग्णांना उपचार देताना डॉक्टर, नर्स यांना पीपीई किट अत्यावश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पीपीई किट घातल्याशिवाय डॉक्टर, नर्सना कोरोना वॉर्डमध्ये जाताच येत नाही. पण, सध्या पीपीई किटची उपलब्धता कमी असून त्यांच्या किमती ही भरमसाठ आहेत.

Mumbai
डॉक्टरच आले डॉक्टरांच्या मदतीला

By

Published : May 10, 2020, 4:48 PM IST

मुंबई- शहरात मोठ्या संख्येने सरकारी आणि खासगी डॉक्टर कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांना पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन ईक्यूपमेंट) कीटची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्यामुळे काही खासगी डॉक्टरांनी पुढाकार घेत या डॉक्टरांसाठी एका संस्थेच्या माध्यमातून नायर आणि बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाला 1250 पीपीई किट दिले आहेत.

कोरोना रुग्णांना उपचार देताना डॉक्टर, नर्स यांना पीपीई किट अत्यावश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पीपीई किट घातल्याशिवाय डॉक्टर, नर्सना कोरोना वॉर्डमध्ये जाताच येत नाही. पण, सध्या पीपीई किटची उपलब्धता कमी असून त्यांच्या किमतीही भरमसाठ आहेत. त्यामुळे या किटची नाही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे विविध सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष आणि उद्योजक पुढे येत पीपीई किटची मदत करत आहेत.

तर पीपीई गरज ओळखत काही खासगी डॉक्टरांनी नायर रुग्णालयाला 750 पीपीई किट दिले आहेत. नायर रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांच्याकडे हे पीपीई किट नुकतेच सुपूर्द करण्यात आले. तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयालाही 500 पीपीई किट देण्यात आल्याची माहिती डॉ. पार्थिव संघवी यांनी दिली. तर यापुढेही जमेल तशी पीपीई किटची मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details