मुंबई - प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी योजना कनिष्ठ महाविद्यालय आणि शिवगजर प्रतिष्ठान यांनी गिरगाव येथील गुढीपाडवा मिरवणुकीत प्रभातफेरी काढत कागदी पिशव्या वापरा निसर्गाची हानी टाळा असा संदेश दिला.
कागदी पिशव्यांचे वाटप करून गुढीपाडवा साजरा - MUMBAI
गिरगाव येथे गुडीपाडव्यानिम्मित एक वेगळीच धमाल असते. मोठ्या संख्येने नागरिक येथे गर्दी करत असतात. यामुळे एकत्र आलेल्या गर्दीचा फायदा घेत शिवगजर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यानी प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती केली. यावेळी ५०० कागदी पिशव्या वाटण्यात आल्या.

आम्ही या शोभायात्रेत प्लास्टिकचा राक्षस तयार केला. प्लास्टिक जास्त वापरू नका. जिथे गरज असेल तिथेच वापर करा. प्लास्टिक वापरण्याचे खूप तोटे आहेत, असे या अभियानात सहभागी झालेल्या मृणाल पांगे यांनी सांगितले.