महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औषध दुकानांचा आढावा - कोरोना व्हायरस बातमी

केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कोरोना विषाणूशी लढण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, कोरोनावर अद्याप कोणताही उपचार पुढे आला नाही. त्यामुळे खबरदारी घेणे हा एकच कोरोनापासून बचावाचा मार्ग असल्याचे सध्यातरी दिसत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे अत्यावश्य आहे. सॅनिटायझर, साबणाने हात धुतले पाहिजे. तर बाहेर पडताना मास्क, पीपीई किटचा वापर करणे अत्यावश्य झाले आहे.

disruption-of-medicines-delivery-system-in-maharastra-due-to-corona-lockdown
disruption-of-medicines-delivery-system-in-maharastra-due-to-corona-lockdown

By

Published : Apr 14, 2020, 5:34 PM IST

मुंबई -जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कोरोना विषाणूशी लढण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, कोरोनावर अद्याप कोणताही उपचार पुढे आला नाही. त्यामुळे खबरदारी घेणे हा एकच कोरोनापासून बचावाचा मार्ग असल्याचे सध्यातरी दिसत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे अत्यावश्य आहे, सॅनिटायझर, साबणाने हात धुतले पाहिजे. बाहेर पडताना मास्क, पीपीई किटचा वापर करणे अत्यावश्य झाले आहे. या साहित्याची उपलब्धता औषधांच्या दुकानात असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना सह इतर आजारांवर लढण्यासाठी लागणाऱ्या औषधांच्या पुरवठा, मागणी, साठा याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औषध दुकानांचा आढावा...

या औषधांची अचानक मागणी वाढली...

कोरोना या संसर्गजन्य विषाणूना रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली असून, यामध्ये औषध व्यावसायिकांची मोठी भूमिका आहे. औषध बाजार तसेच ठोक औषध विक्रेत्यांकडे आतापर्यंत असलेला साठा संपत आल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही औषधाचा तुटवडा भासू लागला आहे. सध्या औषधांच्या दुकानातून एन ९५ मास्क, दोन पदरी तसेच तीन पदरी मास्क, हॅन्ड वॉश, हॅन्ड सॅनिटायझर, रक्तदाब, मधुमेहाची, सर्दी, खोकला, ताप, अशा औषधांची मागणी वाढली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औषध दुकानांचा आढावा...

अपुरे मनुष्यबळ, औषध साठेबाजीमुळे औषध वितरण व्यवस्था विस्कळीत...

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व क्षेत्रावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. मात्र, त्याचवेळी आता अत्यावश्यक, त्यातही आरोग्य क्षेत्रातीलच औषध वितरणावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणि औषध साठेबाजीमुळे औषध वितरण व्यवस्था सध्या काही अंशी विस्कळीत झाली आहे. ही परिस्थिती पुढेही अशीच राहिली, तर औषध टंचाईचे संकट उभे ठाकण्याची भीती व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सुविधांना वगळण्यात आले आहे. मात्र, तरीही औषध वितरण आणि विक्रीवर या लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. कंपन्याकडे औषधांचा मुबलक साठा असूनही वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत.

लॉकडाऊनची घोषणा झाल्याबरोबर ग्राहकांनी सॅनिटायझर्स, मास्क आणि अत्यावश्यक औषधांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. औषधांची वाहतूक आणि वितरण करण्यासाठी मनुष्यबळ, वाहने मिळत नसल्याने वितरण व्यवस्था विस्कळीत झाली झाली आहे. कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती होत आहे. त्यांच्याकडून औषधे गोदामांपर्यंत पाठवलीही जात आहेत. मात्र, त्यानंतर ही औषधे वितरकांपर्यंत आणण्यात अडचणी येत आहेत.

कोरोनाच्या भीतीने कामगार मिळेनासे झाले आहेत. जे येत आहेत त्यांना अडवले जात आहे, मारहाण होत असल्याने कामगारांनी काम करण्यास नकार दिला आहे. यापूर्वी ऑर्डर दिल्यानंतर भिवंडीवरुन 2 दिवसांत औषध साठा येत असे मात्र, आता 10 दिवस वाट पाहावी लागत असल्याची माहिती मुंबई उपनगरातील वितरक हकीम कापसी यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औषध दुकानांचा आढावा...

वितरण व्यवस्थित होत नसल्याने सध्या मधुमेह, रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजारांवरील औषधांचा साठा विक्रेत्याकडे कमी झाला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)कडे तक्रार केली आहे. लॉकडाऊन वाढून औषध टंचाई निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी बिघडेल त्यामुळे सरकारने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी कापसी यांनी केली.

चीनमधून आयात बंद...

कोरोना विषाणूचा प्रसार संपूर्ण देशात होत असून यामुळे भारताने चीनमधील वस्तूंची आयात बंद केली आहे. यामुळे विविध औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना विषाणुचा प्रसार संपूर्ण देशात होत असून यामुळे भारताने चीनमधील वस्तूंची आयात बंद केली आहे. भारतात औषधासाठी लागणारा 60 ते 70 टक्के कच्चा माल चीनमधून येतो. यामुळे देशातील औषधांच्या उत्पादनावर याचा थेट प्रभाव पडणार आहे. असे झाल्यास औषधांचा तुटवडा निर्माण होऊन किंमती वाढण्याची शक्यता आहे.

पॅरासिटॅमॉल हे ड्रग्ज तीन हजारांवर औषधांमध्ये वापरले जाते. यासह हार्मोन टॅब्लेट्स, बेसिक कॅन्सर मॉलेक्युल देखील चीनमधून आयात होतात. हे प्रमाण तब्बल 70 टक्के आहे. चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालाचा एक-दोन महिने पुरेल, इतका साठा औषध कंपन्यांकडे असतो. मात्र, आयात बंद होऊन एक महिना झाला आहे. तसेच हीच स्थिती कायम राहिल्यास औषध उत्पादन प्रभावित होण्याची शक्यता आहे. औषधांचे उत्पादन कमी झाल्यास त्याचे दर वाढण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा फटका रुग्णांना बसणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औषध दुकानांचा आढावा...

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व क्षेत्रावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. मात्र, त्याचवेळी आता अत्यावश्यक त्यातही आरोग्य क्षेत्रातीलच औषध वितरणावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. अपुरे मनुष्यबळ आणि औषध साठेबाजीमुळे औषध वितरण व्यवस्था सध्या काही अंशी विस्कळीत झाली आहे. ही परिस्थिती पुढेही अशीच राहिली तर औषध टंचाईचे संकट उभे ठाकण्याची भीती व्यक्त होत आहे.

औषधांच्या साठेबाजीमुळे औषधनिर्मिती क्षेत्राला फटका...

अत्यावश्यक सेवा म्हणून मुंबईसह राज्यभरातील औषध दुकाने सुरू आहेत. सध्या मास्क, सॅनिटायझर्सची मागणी मोठी आहे. पण त्याचवेळी इतर आजारांवरील औषधांचीही विक्री वाढती आहे. लॉकडाऊन वाढल आहे म्हणत नियमित लागणाऱ्या औषधांची साठेबाजी केली जात आहे. तर दुसरीकडे अनेक औषध निर्मिती कंपन्यांमधील कामगार कामावर येत नसल्याने औषध निर्मितीवर परिणाम होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या कंपन्या औषध निर्मिती करत आहेत त्यांना औषधांची वाहतूक करण्यासाठी वाहने आणि कर्मचारी मिळत नसल्याचे चित्र आहे. एक तर कोरोनाच्या भीतीने कर्मचारी येत नाहीत. तर दुसरे म्हणजे कामावर जाताना रोखले जात असल्यानेही कर्मचारी येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औषध दुकानांचा आढावा...

सध्या मुंबईसह राज्यभर पुरेसा औषधसाठा...

सध्या मुंबईसह राज्यभर पुरेसा औषधसाठा आहे. पण ही परिस्थिती पाहता लवकरच औषध टंचाई निर्माण होण्याची शक्यता फार्मासिस्ट शशांक म्हात्रे यांनी व्यक्त केली. रुग्णांनी गरज नसताना औषध साठेबाजी करू नये, तसेच सरकारने औषध वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्था देखील प्रभावित झाल्याने जळगावात विविध प्रकारच्या औषधांचा तुटवडा भासत आहे.

जळगावात भासतोय औषधांचा तुटवडा..

जळगाव जिल्ह्यात औषधींचा तुटवडा जाणवत आहे. मधुमेह, अती रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर स्वरुपाच्या आजारांसह मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, पक्षघाताची मोठी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आवश्यक असलेली औषधे मिळत नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक बाजारपेठेतील बहुसंख्य मेडिकल्समध्ये असलेला औषधांचा साठा आता संपला आहे. नव्याने मागणी नोंदवूनही औषधींचा पुरवठा कंपन्यांकडून होत नाहीये. लॉकडाऊनमुळे औषधी कंपन्यांच्या उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. कंपन्यांमध्ये लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला साठाही वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने स्थानिक पातळीपर्यंत पुरवण्यात अडचणी येत आहेत.

रुग्णांना होतोय मनस्ताप...

गरजू रुग्णांना वेळेवर औषधी मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगावातील नामांकित मेडिकल्समध्ये देखील आवश्यक ती औषधी तसेच इतर सामुग्री मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर काही लोकांनी खबरदारी म्हणून आवश्यक ती औषधी गरजेपेक्षा अधिक प्रमाणात घेऊन ठेवली. त्यामुळे देखील काही औषधी संपली आहेत. औषधींचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन काही मेडिकल्स चालक मागणी नोंदवून घेत आहेत. त्यानंतर जसजसा औषधींचा साठा उपलब्ध होत आहे, तसा तो मागणीनुसार रुग्णांना पुरवत आहेत.

महानगरांमध्ये शस्त्रक्रिया झालेल्यांचे हाल...
अनेक रुग्ण मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, पक्षघाताची मोठी शस्त्रक्रिया मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील नामांकित दवाखान्यात करतात. तेथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली औषधी देखील त्याठिकाणीच मिळते. मात्र, लॉकडाऊनमुळे सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने औषधी घेण्यास जात येत नाहीये. अशा परिस्थितीत मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये शस्त्रक्रिया झालेल्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

वाहतूक खोळंबल्याने अडचणी...

औषधांचा पुरवठा करणाऱ्या बहुतांश राज्यातील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बाहेर राज्यातील वाहने औषध घेऊन आल्यानंतर परत जाण्यास त्यांना अडचणी येत असल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांचा औषधसाठा बऱ्याच शहरात येत नसल्याचे वास्तव आहे.

कोल्हापुरात औषध पुरवढ्यात अडचणी नाहीत...

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 3 हजार 200 औषधांचे दुकाने आहेत. त्यातले 600 कोल्हापूर शहरात असून 150 होलसेल आहेत. या दुकानांच्या माध्यमातून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत औषधांच्या बाबतीत कोणतीच अडचण आली नसल्याचे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी माहिती दिली आहे. मेडिकल स्टोअरमध्ये हृदय, फुफ्फुस, रक्तदाब अशा आजारांशी संबंधित अँटीबायोटिक्स आणि इतर औषधांचा साठा सुद्धा आत्तापर्यंत ज्या पद्धतीने मागणी नेहमी असते त्या पद्धतीनेच नियमित पुरवठा सुरू आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्या 2 ते 3 दिवस वाहतुकीमध्ये थोड्या अडचणी आल्या. मात्र, प्रत्येकाला पासेस दिल्यानंतर पुरवठा सुरळीत झाला होता. औषधांचा आत्तापर्यंत कोणताच अभाव नसल्याचेही अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. डॉक्टर ज्या औषधांची लिस्ट देतात शक्यतो त्याच्याबदली परस्पर कोणतीही इतर औषधे बदलून दिली जात नाहीयेत अशीही माहिती शेटे यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत औषधांच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याची एकंदरीत माहिती मिळाली आहे.

राज्यात औषध दुकानेचे जाळे मोठ्या प्रमाणात विखुरलेले...

राज्यात औषध दुकानेचे जाळे मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. लॉकडाऊनमध्ये औषधांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे बंधन घालण्यात आले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे वृत्त अधिक गडद झाल्यानंतर मेडिकल दुकानात मास्क आणि सॅनिटायझर घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे काहीकाळ मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा भासला होता. मात्र, आठवडाभरात स्तिथी सामान्य करण्यात राज्य सरकार आणि अन्न आणि औषध प्रशासनाने खूप सहकार्य केल्याचे महाराष्ट्र राजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएश पदाधिकारी शशांक म्हात्रे या फार्मसिस्टने सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औषध दुकानांचा आढावा...

भक्कम नेटवर्क असल्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळापासून ते या क्षणापर्यंत राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यात औषधांची कमतरता नाही. मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठाही योग्य प्रमाणात आहे. होलसेलरकडे मालाचा मुबलक साठा आहे. मात्र कामगार कामावर येत नसल्याने थोडी अडचण होत असल्याचे म्हात्रे यांनी मान्य केल आहे. सध्या असलेल्या परिस्तिथी पाहता ब्रँडचा आग्रह न धरता केमिस्टकडून विश्वासाने जेनरिक औषधे घेत असल्याने ग्राहकांनाही काही अडचण नाही.

मात्र, अनेक दुकानात सोशल डिस्टनसिंग अभावाने पाहायला मिळत आहे, या विषयी अधिक कठोर भूमिका प्रशासनाने आणि जनतेने ही घ्यावी असा सूर औषध दुकानदांनी लावला आहे. डेटॉलचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात डेटॉलची मागणी करत असल्याचेही मेडिकल वाल्यांचे म्हणणे आहे.

व्हिटॅमिन "सी" च्या गोळ्यांची मागणी वाढली...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवणासाठी व्हिटॅमिन "सी" च्या गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने भविष्यात तुटवडा जणवू शकतो, असे औषध वितरकांचे म्हणणे आहे. ह्यासोबत घशाचे इन्फेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या एजिट्रोमायसी आणि कोरोना पेंशट दिल्या जाणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनच्या गोळ्यांनमध्ये देखील काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आयत निर्यात देखील बंद करण्यात आल्याने याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर जाणवत आहे. विशेष म्हणजे औषध निर्मितीसाठी लागणारा 60 ते 70 टक्के कच्चा माल हा चीन मधून येत असल्याने लॉकडाऊनचा काळ वाढल्याने याचा परिणाम औषध निर्मितीवर होवून भविष्यात औषध तुटवडा होऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details