मुंबई- मुंबईत पोलीस आयुक्त पदावर संजय बर्वे हे नुकतेच विराजमान झाले आहेत. मात्र, संजय बर्वे आणि महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदी आलेले देवेन भारती यांच्यातील चढाओढ आता स्पष्टपणे फासून येत आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस खात्यातील नावाजलेले पोलीस निरीक्षक पदावरच्या तब्बल १३ अधिकाऱ्यांनी त्यांची बदली एटीएसमध्ये बदलीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पूर्वकल्पना न देता पोलीस महसंचालकांना पत्रव्यवहार केला. या प्रकारानंतर १३ अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या अधिकाऱ्यांची अखेर बदली करण्यात आली.