मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या ( MVA government ) काळात बंद केलेली जलयुक्त शिवार २.० योजना राज्य सरकारने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ( Cabinet Meeting ) या निर्णयाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. या योजनेमुळे राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होण्यास मदत होणार आहे.
तत्कालीन फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार अभियान ( Devendra Fadnavis Government ) २०१५-२०१९ या कालावधीत राबवले होते. ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. आता नव्याने सुरु होणार असणाऱ्या या अभियानात येत्या ३ वर्षात सुमारे ५ हजार गावे नव्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियान ( Jalyukt Shivar Scheme ) पुन्हा सुरू केल्यामुळे अनेक गावातील शेती जलसमृद्ध होणार आहेत.
लोकसहभागातून करण्यात येणार कामे२२ हजार ५९३ गावात राबविण्यात आले व यामध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण झाली. तसेच २० हजार ५४४ गावे जल परिपूर्ण झाली. या कामांमुळे २७ लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. तसेच कृषीचे विशेषत: रब्बीतील उत्पादनही वाढले. जलयुक्त शिवार अभियान ( Jalyukt Shivar Scheme ) टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबविला गेला आहे. पण अद्याप गावांमध्ये पाण्याची गरज आहे, तेथे देखील ही कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहेत.