मुंबई- विधान परिषदेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद दिसून येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून ५ जागा निश्चित होत असताना बिनविरोध निवडणुकीची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने सहाव्या जागेवरही उमेदवार दिल्याने शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे.
विधान परिषद निवडणूक : सहाव्या जागेवरून महाविकासआघाडीत मतभेद, मुख्यमंत्री ठाकरे संतप्त
काँग्रेस आपल्या सहाव्या उमेदवारीच्या मुद्यावर ठाम असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे
याच दरम्यान काँग्रेस आपल्या सहाव्या उमेदवारीच्या मुद्यावर ठाम असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत. आघाडीत असेच वातावरण असल्यास निवडणूक लढवणार नाही, अशी टोकाची भूमिका ठाकरे यांनी घेतली असल्याचे शिवसेनेच्या गोटात चर्चिले जात आहे.
दरम्यान, यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. बैठकीनंतर सदर मुद्यावर मुख्यमंत्री ठाकरे आपला निर्णय कळवणार आहे.