महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minister Abdul Sattar : अब्दुल सत्तारांवर कारवाई होईपर्यंत राष्ट्रवादी शांत बसणार नाही - जयंत पाटील

मंत्री अब्दुल सत्तार ( Minister Abdul Sattar ) यांनी सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांना केलेल्या शिवीगाळ प्रकारणाचे लोट राज्यभरात उमटत आहेत. अब्दूल सत्तार यांनी भाषेची सर्व मर्यादा ओलांडली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब याबाबत निर्णय घेतला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

NCPs demand to Governor
राष्ट्रवादीची राज्यपालांकडे मागणी

By

Published : Nov 9, 2022, 9:19 AM IST

मुंबई :मंत्री अब्दुल सत्तार ( Minister Abdul Sattar ) यांनी सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांना केलेल्या शिवीगाळ प्रकारणाचे लोट राज्यभरात उमटत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( State President Jayant Patil ) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांची भेट घेत, सत्तारांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी केली. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी शांत बसणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतल्याचे पाटील म्हणाले.


मंत्र्यांकडून वारंवार मर्यादांचे उल्लंघन :अब्दूल सत्तार यांनी भाषेची सर्व मर्यादा ओलांडली आहे. आता हद्द झाली आहे. भारताच्या संसदेच्या सदस्य असेलल्या महिलेचा अशाप्रकारे अपमान करणे, योग्य आहे का? याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. अशा मंत्र्याला मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवदेन आम्ही राज्यपालांना दिल्याचे जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, सत्तांराची ही पहिली घटना नाही. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना चहाऐवजी दारु पिता का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. अनेकवेळा त्यांनी अशा प्रकारे विधाने केली आहेत. मंत्रीमंडळातील सदस्यांनी काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मात्र, त्याचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब याबाबत निर्णय घेतला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

बडतर्फ करा :राज्याची एक राजकीय संस्कृती आहे. आपण कितीही एकमेकांचे विरोधक असलो, तरीही भाषेची मर्यादा नेहमीच सर्वांनी सांभाळली आहे. आपण कोणाचा अरे-तुरे असा एकेरी उल्लेखही करत नाही, अशा परंपरेला छेद देण्याचे काम सत्तार यांनी केले असून त्यांना तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल हे सर्वोच्च न्यायदानाचे केंद्र आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.


काय आहे निवदेन :छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथली माती, इथली संस्कृती आणि परंपरा ही आई समान मानली जाते. स्त्रित्वाचा आदर करून स्त्री सन्मानाचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीदेवी फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाईच्या लेकींचा महाराष्ट्र म्हणून अभिमानाने गौरविला जातो. परंतु या आदर्शवत स्त्रियांच्या संस्कारांना काळिमा फासण्याचे काम महाराष्ट्रात झाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, क्लाईड क्रास्टो, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे आदी नेते यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details