मुंबई SIT For Disha Salian Death Case :दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये नॉर्थ रिजनचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आज एसआयटी स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना राज्य सरकारनं लेखी आदेश जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना पत्राद्वारे याबाबत आदेश दिले आहेत. नागपूर इथं सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणात युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटीच्या माध्यमातून तपास करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी जोर धरला होता.
राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना दिले आदेश : राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त पोलीस आयुक्त उत्तर विभाग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती. दिशा सालियनचा 2020 मध्ये मृत्यू झाला. दिशानं आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु हा मृत्यू संशयास्पद मानला जात होता. राज्य सरकारला या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी हवी आहे, म्हणून विशेष तपास पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना होणार आहे.
दिशा सालियन सेलिब्रेटी मॅनेजर :दिशा सालियन ही एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. दिशा सालियननं अनेक सेलिब्रिटींसाठी काम केलं होतं. यामध्ये सुशांत सिंग राजपूतचाही समावेश आहे. दिशा सालियन दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर म्हणून लोकप्रिय झाली. दिशा सालियननं भारती सिंग आणि वरुण शर्मा यांच्यासह अनेक प्रसिद्ध भारतीय व्यक्तींसोबत काम केलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 9 जून 2020 मध्ये दिशानं 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मात्र अद्याप दिशा सालियनच्या आत्महत्येमागील कारणं समजू शकलेली नाहीत. दिशा सालियन आर्थिक संकटाचा सामना करत होती, अशी चर्चा करण्यात येत होती. त्यामुळे दिशा सालियननं हा टोकाचा निर्णय घेतला होता, अशी चर्चा तेव्हा होत होती. मात्र त्याला आता दिशा सालियनच्या आत्महत्येला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
- Disha Salian Case : दिशा सालीयन मृत्यूच्या आरोप प्रकरणी आदित्य ठाकरे ठोठावणार कोर्टाचे दरवाजे
- Aaditya Thackeray Bombay HC : सुशांत सिंह, दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची हायकोर्टात धाव, वाचा काय आहे प्रकरण?
- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, नोटीस जारी; वाचा काय आहे प्रकरण?