मुंबई :कोकणातील बारसू रिफायनरी सर्वेक्षण काम लवकरच सुर होणार आहे. सर्वेक्षणाविरोधामध्ये आज दुसऱ्या दिवशीही आंदोलकांचा विरोध कायम आहे. आंदोलनाची दखल घेतली शरद पवार यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबत फोनवर चर्चा केलीची माहिती समोर येत आहे .
स्थानिकांचे मत विचारत घ्या :गेल्या दोन दिवसापासून कोकणातील बारसू सोलगाव रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनासंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत दूरध्वनीने संपर्क केला. बारसू प्रकरणी स्थानिक पातळी लोकांशी चर्चा करून पुढे जावे ही भूमिका पवार यांनी मांडली. सदर सर्वे थांबवा लोकांच्या सोबत आपण चर्चा करून आपण त्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढू. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडून द्यावे. स्थानिकांना डावलता कामा नये कारण त्यांना जर आपण त्यांना विश्वासात घेतलं नाही तर प्रोजेक्ट अडचणीतील येण्याची शक्यता आहे. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बोलून त्यांना कळवतो असे आश्वानह दिले.
उदय सामंत यांनी दाखवलं पत्र :भारत सरकारला महाराष्ट्रात मेघा ऑइल रीफायनरी प्रकल्प उभा करायचा होता त्या हेतूने रत्नागिरीतील नाणार येथे हा प्रकल्प होणार होता मात्र त्याला स्थानिकांनी आणि शिवसेनेने विरोध केल्यामुळे प्रकल्प थांबविण्यात आला. राज्यात महाविकास आघाडीचे अर्थात ठाकरे सरकार आल्यानंतर नाणार ऐवजी प्रकल्प बारसू सोलेगाव येथे उप उभारण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवला होता . केंद्र सरकारची संमती मिळाल्यानंतर स्थानिक आक्रमक झाले आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते तर याला स्थानिकांनी विरोध केला नसता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांचा गैरसमज दूर केला जाणार आहे.
रत्नागिरीतील बारसू रिफायनरी संरक्षणाचा वाद पेटला :बारसू रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याचे चित्र आज पाहायला मिळालं. गोळ्या घाला खून करा आम्ही हटणार नाही अशा प्रकारची भूमिका स्थानिकांनी घेतली होती. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस होता यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर काही महिलांनी झोपून पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. वारंवार पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नसल्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा - Vajramuth Sabha : महाविकास आघाडीची पुण्यातील वज्रमूठ सभेचा मुहूर्त चुकणार