भाजप प्रदेशाध्यक्षपदी ठाकूर, कुटे आणि हाळवणकर यांच्या नावाची चर्चा - संजय कुटे
भाजप प्रदेशाध्यक्षपदी ठाकूर, कुटे आणि हाळवणकर यांची नावे आघाडीवर..दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
![भाजप प्रदेशाध्यक्षपदी ठाकूर, कुटे आणि हाळवणकर यांच्या नावाची चर्चा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3516049-890-3516049-1560096053044.jpg)
मुंबई
मुंबई - खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत जानेवारी 2019 मध्ये संपली आहे. तसेच दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळाल्याने भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात असून उपाध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रदेश कोर कमिटीची बैठक बोलावली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीसह प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरही चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Last Updated : Jun 9, 2019, 11:42 PM IST