मुंबई - पुराने वेढा घातलेल्या सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत २ पालीच्या नव्या प्रजाती असल्याचा शोध लागला आहे. महाराष्ट्रातील तीन तरुण उभयसृपशास्त्रज्ञांना कोयनेच्या खोऱ्यातून निमास्पिस कोयनाएन्सिस आणि आंबा घाटामधून निमास्पिस आंबा या दोन नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत. या उभयसृपशास्त्रज्ञांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांचा समावेश आहे.
पूरग्रस्त भागात २ नव्या प्रजातींचा शोध; शोधात तेजस ठाकरेंचा समावेश - mumbai news
पुराने वेढा घातलेल्या सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत दोन पालीच्या नव्या प्रजाती असल्याचा शोध लागला आहे. या उभयसृपशास्त्रज्ञांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांचा समावेश आहे.
उभयसृपांच्या प्रजातीचे 50 टक्केच वर्गीकरणाचे काम झाल्याने अजूनही या गटात नव्या प्रजातींचा उलगडा होत आहे. गेल्या दशकभरात या जीवांविषयी संशोधनाचे काम करणारी संशोधकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. या कामाअंतर्गत राज्यातील उभयसृपशास्त्रात संशोधनकार्य करणारे संशोधक अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि तेजस ठाकरे यांनी दोन नव्या पालींचा उलगडा केला आहे. खांडेकर आणि अग्रवाल हे बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्स्टिट्यूट या संस्थेत कार्यरत आहेत. या पाली जून 2018 मध्ये आढळून आल्या होत्या. काही महिने अभ्यास केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी या पालींवरचा शोध निबंध झुटॅक्सा या आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेकडे तपासणीकरिता पाठविला होता. मंगळवारी झुटॅक्साने या संशोधनाचे वृत्त प्रकाशित केले. या दोन्ही प्रजाती निम्यास्पीस या पोटजातीमधील आहेत. पालींच्या या पोटजातीमध्ये भारतात सुमारे 39 प्रजाती आढळतात.