मुंबई -जगभरात आढळून आलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १८ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतही ओमायक्रॉनचे ५ रुग्ण आढळून आले आहेत. ( Omicron In Mumbai ) त्यापैकी ३ रुग्णांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मुंबईत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
आतापार्यंत ३ ओमायक्रॉन रुग्णांना डिस्चार्ज -
१ डिसेंबर ते ११ डिसेंबरदरम्यान अति जोखमीच्या देशातून ६४७७ आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत विमानतळावर आले. त्यापैकी ८ पुरुष व २ स्त्रिया अशा एकूण १० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर १ नोव्हेंबरपासून २४ पुरुष आणि १० स्त्रिया असे एकूण ३४ प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोविड पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले ४ पुरूष आणि ८ स्त्रिया असे एकूण १२ सहवासित पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांचे जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या असता ४ पुरुष व १ स्त्री असे एकूण ५ प्रवासी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३ ओमायक्रॉन रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.