मुंबई -पोलिसांतील १० उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यावरुन राज्याच्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद चव्हायावर आले आहेत. तीनच दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याने राष्ट्रवादीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोलिसांच्या अंतर्गत बदल्यावरुन महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद... - पोलिसांच्या बदल्या बातमी
राज्यात नुकतेच लादण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांनी आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारात घेतले गेले नाही. त्यामुळे त्यावरील नाराजी दूर झाली नसतानाच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांना दिलेल्या स्थगितीमुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
राज्यात नुकतेच लादण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांनी आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारात घेतले गेले नाही. त्यामुळे त्यावरील नाराजी दूर झाली नसतानाच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांना दिलेल्या स्थगितीमुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या त्यातील रश्मी करंदीकर, शहाजी उमप, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, मोहन दहिकर, प्रणय अशोक, नंदकुमार ठाकूर या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्या अधिकारात मुंबईतील १० उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चाही केली होती असे सांगण्यात येते असले तरी तिसऱ्याच दिवशी मिळालेल्या स्थगितीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी नाराजी पसरली आहे. दरम्यान, यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात खुलासा केला. त्यात ते म्हणाले की, मुंबई पेालीस आयुक्त कार्यालयांनी केलेल्या दहा पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या या मुख्यमंत्री आणि माझ्या कार्यालयाने रद्द केल्या आहेत. मात्र, या विषयावरुन आमच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही मतभेद नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडीत निर्णयांच्या विषयांवर निर्माण होत असलेले मतभेद आणि नाराजी यावर लक्ष देण्याची विनंती केली होती. परंतु, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला न जुमानता त्यांच्याकडे असलेल्या गृहखात्याच्या अंतर्गत येत असलेल्या मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील बदल्या रद्द केल्या. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी नाराजी व्यक्त केली जात असल्याचे सांगण्यात येते.
दोन आठवड्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही निर्णय प्रक्रियेवरुन महाविकास आघाडीतील नाराजीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी राज्यात कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी न्याय योजना लागू करण्याची मागणी केली होती. त्यावरही अद्याप मुख्यमंत्र्यांनी पाऊले उचलली नसल्याने काँग्रेस नेत्यांमध्येही मतभेद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.