मुंबई :दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला डॉक्टरचा लैंगिक छळ ( Dindoshi Police Handcuffs Doctor ) आणि धमकी दिल्याप्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात तक्रार दाखल केली ( Doctor For Sexually Harassing a Woman ) होती. त्यानुसार दिंडोशी पोलीस आणि आयपीसी कलम 354(A)(3), 500, 504, 506, 509 आणि आयटी कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये जवळचे संबंधदिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी असलेल्या महिला डॉक्टरची आरोपी डॉक्टरशी मैत्री होती आणि हे दोघेदेखील बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून काम करत होते. मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये जवळचे संबंध निर्माण झाले होते. त्यातून पैशांची दिवाण-घेवाण दोघांमध्ये झाली होती. तक्रारदार महिला डॉक्टरकडून आरोपी डॉक्टरने पैसे घेतले होते. ते पैसे परत देण्यासाठी महिला डॉक्टरने आरोपी डॉक्टरकडे तगादा लावला होता.