महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Crime : व्यापारास लुटणाऱ्या राजस्थानी कुमावत गॅंगला दिंडोशी पोलिसांनी केली अटक

By

Published : Dec 23, 2022, 10:56 PM IST

मध्य प्रदेशातील इंदोर येथील व्यापारास लाखोंचा गंडा घालणाऱ्या ( robbed the businessman ) राजस्थानी कुमावत गॅंगला दिंडोशी पोलिसांनी अटक ( Dindoshi police arrested the Rajasthani Kumawat gang ) केली आहे. याप्रकरणी २१ डिसेंबरला दिंडोशी पोलिस ठाण्यात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिंडोशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ३४, १२० (३) सह आयटी ऍक्ट कलम ६६ (डी) अन्वये  गुन्हा नोंद करण्यात आला.

Mumbai Crime
राजस्थानी कुमावत गॅंगला अटक

मुंबई :मुंबईतील गुन्हेगारी ( Mumbai Crime ) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्येच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथील व्यापारास लाखोंचा ( robbed the businessman ) गंडा घालणाऱ्या राजस्थानी कुमावत गॅंगला दिंडोशी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक ( Dindoshi police arrested the Rajasthani Kumawat gang ) केली आहे.

राजस्थानी कुमावत गॅंगला अटक : मुंबई पोलिसांनी याप्रकरणी 21 डिसेंबरला दिंडोशी पोलिस ठाण्यात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिंडोशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 34, 120(3) सह आयटी ऍक्ट कलम 66 (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. विक्रम अचलाराम कुमावत (वय 23), मुकेश तगाराम कुमावत, (वय 28), हसमुख पुखराज सुराणा, (वय 52), मोहनलाल अचलाराम कुमावत (वय32), विक्रम लालचंद सुराणा वय 40 वर्षे अशी आरोपींची नावे आहेत.


पोलिसांची माहिती : या गुन्ह्याची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 17 डिसेंबरला फिर्यादी उज्वल रामप्रसाद चांडक यांच्या मोबाईल क्रमांकावर त्यांचे परिचयाचे इंदौर येथे राहणारे व्यापारी भुरामत जैन यांचा फोन आला आणि त्यांनी फिर्यादींना सांगितले की, त्यांचे प्रसिद्ध कपडे व्यापारी मित्र जितमल जैन यांचे मुलाचे काम आहे. या कामाबाबत त्यांनी पुढे असे सांगितले की, जितमल जैन यांचा मुलगा यश जैन याचे वीस लाख रूपये हे इंदौर येथे असून त्यास मुंबई येथे पाठवायचे आहे. भुरामल जैन यांनी फिर्यादीला यश जैन याचा मोबाईल क्रमांक दिला व त्याच्यासोबत बोलणे करून काम करण्यास सांगितले.

अशी केली फसवणूक : 17 डिसेंबरला फिर्यादीने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून यश जैन याला कामाबाबत विचारणा केली असता त्याने फिर्यादीला त्याचा एक माणूस वीस लाख रुपये घेवून येईल ते पैसे इंदौरहून मुंबई येथे पाठवायचे आहेत असे सांगितले. नंतर काही वेळाने यश जैन याने पुन्हा फिर्यादी यांना सांगितले की, त्याच्या माणसास वेळ लागणार असून तोपर्यंत फिर्यादीने त्याच्या स्वत:जवळील वीस लाख रुपये यश जैन याचा मालाड, मुंबई येथील साथीदार महावीर भाई, यास पाठविण्याची विनंती केली. त्यावरून फिर्यादी यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 20 लाख रक्कम अंगडीयामार्फत यश जैनचा साथीदार महावीर भाई यास मुंबई येथे पाठविली. त्यानंतर यश जैन याने बराच वेळापर्यंत फिर्यादीस पैसे न पाठविल्याने फिर्यादी व भुरामल जैन यांनी यश जैन व महावीर भाई यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन स्विच ऑफ आढळुन आले. त्यानंतर भुरामल जैन यांनी त्यांचा मित्र जितमल जैन यास याबाबत कळविले असता, जितमल जैन यांनी त्यांचे मुलाचे नाव यश जैन नाही, तसेच यश जैन याचा मोबाईल क्रमांक देखील त्यांचे मुलाचा नसल्याचे कळविले. यावरून यश जैन नाव धारण करणाऱ्या इसमाने तो उद्योगपती जितमल जैन यांचा मुलगा बोलत आहे असे भासवून, इतर साथीदारांसोबत संगनमत करून खोटी नावे सांगुन फिर्यादी व त्यांचा मित्र भुरामल जैन यांना रुपये 20,00,000/- मुंबईस पाठविण्यास सांगुन त्यांची फसवणुक केली.

पोलिसांनी अशी केली अटक : दिंडोशी पोलिस ठाण्याने दोन पोलीस पथके बनतुन तांत्रिक तपास करून सदर गुन्हयातील आरोपींपैकी दोन आरोपी हे कुरारगाव मालाड पूर्व मुंबई येथे राहत असलेल्याबाबत माहिती प्राप्त केली. त्यानंतर कुरगाव येथील तानाजीनगर परिसरातून दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे इतर पाहिजे आरोपीताबाबत चौकशी करून लागलीच इतर तीन आरोपींना राजस्थान येथे पळून जाण्याचे बेतात असताना विरार पश्चिम येथुन शिताफीने ताब्यात घेतले आहे. अटक केलेल सर्व आरोपी हे राजस्थान येथील पाली जिल्हयातील रहिवासी आहेत. आतापर्यंत गुन्हयात फसवणुक झालेल्या रकमेपैकी रुपये 14,50,000/- रोख रक्कम आरोपीताकडुन हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी नामे हसमुख पुखराज सुराणा याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे तसेच कर्नाटक येथे 10 गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details