महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

1992 Riots: दिंडोशी पोलिसांनी 1992 च्या दंगली मधील फरार आरोपीला केली अटक - फरारी घोषीत करून त्यांचे वॉरंट जारी केले

दिंडोशी पोलीस ठाण्यात ८ डिसेंबरला फिर्यादी दत्तात्रय धोंडू कदम (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात एकूण ९ आरोपींवर सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. (1992 Riots) त्यापैकी दोन आरोपींना सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आणि एक आरोपी हा मयत झाला होता.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Dec 11, 2022, 7:11 PM IST

मुंबई -या प्रकरणातील सहा आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने २००४ मध्ये त्यांना फरारी घोषीत करून त्यांचे वॉरंट जारी केले होते. या गुन्ह्यात आरोपी नंबर ८ चे नाव तबरेज अजीम खान उर्फ मन्सुरी होते. या गुन्हयातील फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना अटक आरोपी इसम हा मागील १८ वर्षांपासून लपवून राहत आहे. याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे यांना माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्य वापरून १० डिसेंबरला या आरोपीस दिंडोशी बस डेपो, मालाड पूर्व, मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपिकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत त्याचा या गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपीचे नाव - तबरेज अजीम खान उर्फ मन्सुरी (४७) असून तो तलतनहा हाउस, दिंडोशी बस डेपोजवळ, मालाड पूर्व येथील रहिवासी आहे. ही यशस्वी पोलीस कामगिरी वीरेन्द्र मिश्र, अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रदेशिक विभाग, स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१२, संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, दिंडोशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन खरात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, धनंजय कावडे, पोलीस निरिक्षक (गुन्हे), पोलीस उप निरिक्षक नितीन सवणे, पाहिजे फरारी पथकाचे / तडीपार पथकाचे पोलीस हवालदार सचिन तुपे, पोलीस शिपाई राहुल पाटील, पोलीस शिपाई शैलेद्र भंडारे, पोलीस शिपाई अमोल वैरागर यांनी पार पाडली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details