मुंबई - सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये काल (सोमवारी) सायंकाळी महाविकासआघाडीचा शक्तीप्रदर्शन आणि एकजुटीसाठी संविधान शपथ विधीचे आयोजन केले होते. त्यावेळी आम्ही 162 अशी एकजुटीची ताकद दाखवण्यात आली. मात्र, काही वेळातच ग्रँड हयात हाँटेलमध्ये दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ उपस्थित झाले. यामुळे महाविकासआघाडीचे संख्याबळ 163 इतके झाले आहे.
दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळांची वापसी; 'महाविकासआघाडी'चे संख्याबळ 163 - नरहरी झिरवळ बातमी मुंबई
शिवसेना खासदार राजन विचारे आणि हेमंत गोडसे यांनी कोणाच्याही संपर्कात नसलेल्या नरहरी झिरवळ यांना शोधून काढले. त्यांना महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात उपस्थित केले. आपण गैरसमजुतीने गेलो होतो, असे नरहरी झिरवळ यांनी परत आल्यावर सांगितले.
नरहरी झिरवळ
हेही वाचा-'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना खासदार राजन विचारे आणि हेमंत गोडसे यांनी कोणाच्याही संपर्कात नसलेल्या नरहरी झिरवळ यांना शोधून काढले. त्यांना महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात उपस्थित केले. आपण गैरसमजुतीने गेलो होतो, असे नरहरी झिरवळ यांनी परत आल्यावर सांगितले. त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफीही मागितली. आता फक्त राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हेच परत येण्याची बाकी राहिलेले एकमेव आमदार आहेत.
Last Updated : Nov 26, 2019, 8:53 AM IST