मुंबई: कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटताना दिसत आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिजाब मुद्यावर शांती (Dilip Walse Patil appeals on hijab issue) राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री म्हणाले, आंदोलन करण्याची परवानगी कोणालाही नाही. त्यामुळे सर्वांनी शांतता ठेवावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. त्या ठिकाणी पोलिसांनी पूर्ण लक्ष ठेवलेलं आहे.
मागील काही दिवसांपासून हिजाब मुद्द्यावरून कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्राच्या ही काही भागांमध्ये आंदोलनं केली जात आहेत. त्या सर्व भागात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) म्हणाले, धर्मगुरूंनी आपल्या लोकांना शांती ठेवण्याचं आवाहन केलं पाहिजे. त्याचबोरबर राजकीय नेत्यांनीही या मुद्द्यावर राजकारण करू नये.
कर्नाटक मध्ये सुरु असलेल्या हिजाबच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात देखील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कर्नाटकातून हिजाबचा मुद्दा आता महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली असून, राज्यात मालेगाव सहित इतर काही भागांमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून आंदोलन केली जात आहेत. मात्र सर्वांनी शांतता राखली पाहिजे. राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये. परराज्यातील मुद्यावरून राज्यात आंदोलन करून शांतता बिघडवू नका, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व राजकीय नेत्यांना केला आहे.
तसेच जातीजातीमध्ये किंवा धर्म धर्मामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास समाजाची शांतता बिघडते. त्यामुळे हिजाब सारख्या मुद्द्यावरून नागरिकांनी आंदोलन करू नये. असं आवाहन गृहमंत्र्यांनी मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. तसेच आंदोलन करण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. जिथे हिजाबच्या मुद्द्यावरून आंदोलन होऊ शकतात, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्यासची यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले.