महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मुघल-ए-आझम" दोनदा पहिला - राज्यपाल कोश्यारी यांची दिलीप कुमार यांना वाहिली श्रद्धांजली - दिलीप कुमार यांचे निधन

दिलीप कुमार यांचा "मुघल-ए-आझम" मला इतका आवडला की मी लगोलग दोन वेळा पहिला. परंतु त्यानंतर चित्रपट पाहणे झाले नाही, आणि "मुघल-ए-आझम" मी पाहिलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

dilip kumar passed away reactions of governor koshyari
"मुगले आझम दोनदा पहिला"

By

Published : Jul 7, 2021, 12:36 PM IST

मुंबई - दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील ते नायक होते. दिलीप कुमार यांचा "मुघल-ए-आझम" मला इतका आवडला की मी लगोलग दोन वेळा पहिला. परंतु त्यानंतर चित्रपट पाहणे झाले नाही, आणि "मुघल-ए-आझम" मी पाहिलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

दिलीप कुमार महानायक होते -

भारतीय चित्रपट सृष्टी आज जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या यशाचे शिल्पकार जसे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार व गायक आहे. तसेच दिलीप कुमार यांच्यासारख्या सशक्त अभिनेत्यांचाही यात वाटा आहे. दिलीप कुमार हे एक दंतकथा झाले होते. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. माझ्याकरीता ते महानायक होते. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या पत्नी सायरा बानो व त्यांच्या असंख्य चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा - Tragedy King Dilip Kumar Died : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details