महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Difficulties of starting ST : संपामुळे 'लालपरी'ला 1600 कोटींचा तोटा - एसटी कर्मचाऱ्यांचा संप

कोरोनानंतर (After Corona) एसटी महामंडळाचे (ST Corporation) आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण (Merger into state government) करण्याचा मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी टोकाचा संप (ST workers strike) पुकारला. हा संप साडे तीन महिन्यापासून सुरु आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. संपामुळे १७ फेब्रुवारी पर्यंत एक हजार ६०० कोटींचे ( Loss of Rs 1600 crore to 'Lalpari' due to strike) नुकसान झाले आहे. त्यामुळे संचित तोटा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

ST
एसटी

By

Published : Mar 1, 2022, 7:22 PM IST

मुंबई:कोरोनामुळे एसटी महामंडळाचा आधिच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आता एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपला साडे तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामूळे एसटीची राज्यभरातील सेवा ठप्प झाली आहे. परिणामी राज्य सरकारने खासगी प्रवासी वाहतूकदारांना सध्या राज्य प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून मनमानी भाडे वसूल करून प्रवाशांची आर्थीक लुट चालवली आहे. एसटीच्या बसेस चालवण्यासाठी सुद्धा एसटी प्रशासनाकडे कर्मचारी नसल्याने एसटीच्या नुकसानीला संप जबाबदार ठरत आहे. नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपामुळे एसटी महामंडळाचे ४३९ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले होते. त्यात आणखी वाढ झाली असून, ते १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहेत.

कोरोना काळात ७ हजार ९५१ कोटी रुपयांचा तोटा -
गेली ७२ वर्षे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणखी किफायतशीर प्रवासी सेवा देणारी लालपरी अर्थात एसटी महामंडळाला कोरोनापूर्वी ४ हजार५४९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र एसटीला कोरोना काळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या 3 हजार 800 कोटीं रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे एसटीचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एसटीला जवळ जवळ ७ हजार ९५१ कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यामुळे आता एसटी महामंडळाचा संचित तोट्याचा आकडा हा १४ हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे.

पुर्णक्षमतेने एसटी सुरु करण्यात अडचणी -
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, एसटी महामंडळातील एकूण 92 हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी सध्या एसटीच्या कर्तव्यावर हजर झाले आहे. मात्र सर्वाधीक एसटी कर्मचारी अद्याप संपात सहभागी आहेत. त्यामूळे अद्याप एसटीची सेवा पुर्णक्षमतेने सुरू करण्यात प्रशासनाला अडणचणी येत आहे. यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागत आहेत.

आर्थिक वर्षसंचित तोटा (कोटींमध्ये)
2014-15 = 1 हजार 685
2015-16 = 1 हजार 807
2016-17 = 2 हजार 330
2017-18 = 3 हजार 663
2018-19 = 4 हजार 549
2019-20 = 5 हजार 192
2020-21 = 14 हजार

ABOUT THE AUTHOR

...view details