महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

2019 सालात किती रेल्वे प्रवाशांचा मृत्यू? जीआरपी पोलीस संभ्रमात - RTI petitioners

रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी माहिती अधिकाराखाली 2 वेगवेगळ्या 'आरटीआय' याचिकाकर्त्यांना दिलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे.

रेल्वे
रेल्वे

By

Published : Feb 19, 2020, 3:18 PM IST

मुंबई - शहराची लाईफ-लाईन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या माध्यमातून दररोज तब्बल 80 लाख प्रवासी प्रवास करीत असून दिवसेंदिवस या गर्दीत वाढ होत असल्याने प्रवासादम्यान अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. रेल्वेच्या मध्य, पश्चिम, हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर घडणाऱ्या अपघातात दररोज किमान 10 ते 12 जणांचा मृत्यू होत आहे. मात्र, रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी सन 2019 च्या माहिती अधिकाराखाली 2 वेगवेगळ्या आरटीआय याचिकाकर्त्यांना दिलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे.

2019 सालात किती रेल्वे प्रवाशांचा मृत्यू? जीआरपी पोलीस संभ्रमात

'आरटीआय' कार्यकर्ते शकील अहमद यांना मिळालेल्या 'आरटीआय' माहितीत जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या दरम्यान रेल्वेच्या हद्दीत लोकलने प्रवास करीत असताना पडून किंवा रेल्वे रूळ ओलांडताना घडलेल्या दुर्घटनेत 2123 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर एकूण 1758 प्रवाशी जखमी झाले आहेत. मध्य रेल्वे मार्गावर एकूण 1384 प्रवाशांची मृत्यू आणि 1047 प्रवासी जखमी झाले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मार्गावर एकूण 739 प्रवाशांची मृत्यू आणि 711 प्रवासी जखमी झाले आहे.

हेही वाचा -'बीएसएनएल'चे कुटुंब विस्कटले, ते न सावरण्यासाठीच... ४०० कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती

मात्र, आणखीन एक आरटीआय कार्यकर्ता समीर झवेरी यांना जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या दरम्यान माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यातून पडून किंवा रेल्वे रूळ ओलांडताना 2664 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 3158 प्रवासी जखमी झाले आहेत, अशी वेगळी माहिती मिळाली आहे. यात मध्य रेल्वे मार्गावर एकूण 1393 प्रवाशांची मृत्यू आणि 1836 प्रवासी जखमी झाले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मार्गावर एकूण 928 प्रवाशांचा मृत्यू आणि 1322 प्रवाशी जखमी झाले आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर रेल्वे रूळ ओलांडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना 2013 पासून 2018 पर्यंत एकूण 19430 प्रवाशांनी प्राण गमावले आणि एकूण 20168 प्रवासी जखमी झाले.

वर्षाप्रमाणे किती मृत्यू? किती जखमी?

2013 मध्ये एकूण 3506 लोकांचा मृत्यू 3318 जखमी

2014 मध्ये एकूण 3423 लोकांचा मृत्यू 3299 जखमी

2015 मध्ये एकूण 3304 लोकांचा मृत्यू 3349 जखमी

2016 मध्ये एकूण 3202 लोकांचा मृत्यू 3363 जखमी

2017 मध्ये एकूण 3014 लोकांचा मृत्यू 3345 जखमी

2018 मध्ये एकूण 2981 लोकांचा मृत्यू 3494 जखमी

रेल्वे पोलीस अशा गंभीर विषयावर दोन वेगवेगळ्या अर्जांवर वेगवेगळी माहिती देत आहेत. यामुळे रेल्वे पोलिसांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पूर्वीही आरटीआयच्या माध्यमातून दिलेली माहितीसुद्धा अशाच प्रकारे चुकीची देण्यात आली आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा -विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details