महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट - mumbai suicide

घटनास्थळी डीबी मार्ग पोलिसांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत हिरे व्यापारी धिरेनभाई शाह यांना जे. जे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

suicide
मुंबईत हिरे व्यापाराची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By

Published : Feb 18, 2020, 5:56 PM IST

मुंबई - ऑपेरा हाऊस येथील 'प्रसाद चेंबर' या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून धिरेनभाई चंद्रकांत शाह या ६१ वर्षीय हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी ही घटना घडली.

हेही वाचा -अखेर.. इंदोरीकर महाराज यांचा माफीनामा; म्हणाले...

घटनास्थळी डीबी मार्ग पोलिसांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत शाह यांना जे. जे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. शाह यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते, असे सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details