मुंबई- जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. धोनीने २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र, त्यानंतर क्रिकेटप्रती निष्ठा आणि मेहनतीच्या जोरावर धोनीने स्वत:ला सिद्ध केले.
पहिल्याच सामन्यात झाला होता शून्यावर बाद, नंतर ठरला 'सर्वोत्तम कर्णधार'
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
एक उत्कृष्ट कर्णधार, वेगवान यष्टीरक्षक आणि क्रिकेटच्या दुनियेतील 'चाणक्य' अशी धोनीची ओळख आहे. १९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर, २०११ मध्ये तब्बल २८ वर्षांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकरंडक उंचावला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने मारलेला अफलातून षटकार आणि रवी शास्त्री यांचे 'धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप' हे समालोचन आजही लोंकाना फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाते. सचिन एकदा म्हणाला होता की, धोनी त्याच्याबरोबर खेळलेल्या सर्व कर्णधारांपैकी सर्वोत्तम आहे. सचिनचे हे शब्द धोनीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगून जातात.
धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत त्याने भारताकडून ३५१ एकदिवसीय सामने आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी ४ हजार ८७६ धावा, टी-२० मध्ये १० हजार ७७३ एकदिवसीय आणि १ हजार ६१७ धावा केल्या आहेत.