मुंबई- देशभरात मतदानाच्या घसरत्या टक्केवारीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना काही मतदार परदेशातूनही भारतात येऊन मतदान करत असल्याचे चित्र समोर येत आहे. धीरज मोरे या मतदाराने खास मतदानासाठी ब्राझिलहून मुंबई गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. धीरज मोरे यांच्याशी याबाबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
मतदानासाठी धीरज मोरे ब्राझिलहून मुंबईत; बजावला मतदानाचा हक्क - election
धीरज मोरे या मतदाराने खास मतदानासाठी ब्राझिलहून मुंबई गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला
धीरज मोरे
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये मी मतदान करत आहे, याचा मला खूप अभिमान आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन धीरज मोरे यांनी केले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत मी मतदान करण्यासाठी भारतात येतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.