मुंबई - राज्यातील मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. त्यामुळे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना समितीचे अध्यक्षपद का दिले नाही, असा प्रश्न धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला. या समितीचे कामकाज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली चालणार असल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास का ठेवावा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश शेंडगे बोलत होते.
राज्यात ओबीसी समाजाच्या विकासासाठी महाज्योती संस्थेचे अजूनही कामकाज सुरू झाले नाही. शिवाय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या एकाही विषयावर निर्णय झाला नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून जो न्याय सारथीला दिला जात आहे. तो न्याय ओबीसी समाजाला का दिला जात नाही, असा सवाल करत शेंडगे यांनी सरकारवर टीका केली.
नाहीतर राज्यात उद्रेक होईल
मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, यासाठी आमचे समर्थन आहे. मराठा नेत्यांना आरक्षण मिळणार नाही, हे लक्षात आल्याने ते ओबीसी कोट्यातून आरक्षण मागत आहेत. मात्र, असा कोणताही प्रस्ताव सरकारने पारित करू नये. नाहीतर राज्यात उद्रेक होईल, असा इशारा शेंडगे यांनी दिला.
तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही