मुंबई - सरकारने आतापर्यंत आमच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली. आता आम्हाला शिफारस नको, धनगरांच्या पोरांच्या हातात एसटीचे प्रमाणपत्र द्या, अशी थेट मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने आज केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळाचे सदस्य माध्यमांशी बोलत होते.
धनगर आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाशी भेट झाली. राज्याचे महाधिवक्ता यांचे मत विचारात घेऊन पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे कुठलाच ठोस निर्णय या बैठकीत झाला नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा वर्षा बंगल्यावर गेले होते. पण, ही बैठक निष्फळ झाल्याचे दिसत आहे.