महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुमच्या संवेदना संपल्या आहेत का?, आप नेत्याचा राम कदम यांना सवाल - आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे

रविवारी राम कदम यांनी घाटकोपर मतदार संघातील एका झोपडीत अंधारात दिवे लावतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला. विरोध करने वालो को ये करारा जवाब है, असे ते म्हटले होते. यावरुन आपच्या महाराष्ट्र नेत्यांनी राम कदम यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.

राम कदम
राम कदम

By

Published : Apr 6, 2020, 3:23 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्चला संपूर्ण देशवासीयांना रात्री ९ वाजता घराच्या लाईट बंद करून दिवे पेटवायला सांगितले होते. यावर देशभरातून विरोधक आणि काही लोक टीका करत होते. मात्र, रविवारी राम कदम यांनी घाटकोपर मतदार संघातील एका झोपडीत अंधारात दिवे लावतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला. विरोध करने वालो को ये करारा जवाब है, असे ते म्हटले होते.

राम कदम

यावरुन आपच्या महाराष्ट्र नेत्यांनी राम कदम यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. साडेपाच वर्ष केंद्रात आणि ५ वर्ष राज्यात सत्ता असतानादेखील तुमच्या मतदार संघातील या गरीबाला साधे घर देऊ शकला नाहीत. आता त्याच गरिबाची लक्तरे ट्विटरवर टांगून सेलिब्रेशन करताय. याला विकृतपणा म्हणतात मराठीत, असा टोला आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी कदम यांना लगावला आहे.

धनंजय शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details