महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhananjay Munde health : धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू; मुख्यमंत्र्यांनी केली फोन वरून तब्येतेची चौकशी - ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार

आमदार धनंजय मुंडे हे मंगळवारी दिवसभर ( Dhananjay Munde car accident ) मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटपून परळीकडे परतत असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परळी शहरात अपघात झाला. त्यांच्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. त्यात त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला ( car accident in Beed Parli ) आहे. काळजी घेण्याचे काही कारण नाही व अफवा पसरवू नका असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. (Dhananjay Munde health)

Dhananjay Munde health
धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

By

Published : Jan 5, 2023, 2:29 PM IST

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये काल एअरलिफ्ट करण्यात आले. ( Dhananjay Munde car accident ) परळी येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला असून, त्यांच्या छातीला या अपघातात दुखापत झाली आहे. या अपघातात त्यांच्या बरगड्यांना मार लागल्यामुळे त्यांचे पुढील उपचार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कालपासून सुरू करण्यात आले आहेत. ( car accident in Beed Parli ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तर तिथेच विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ( NCP senior leader Ajit Pawar ) यांनीही धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी काल रात्री रुग्णाला जाऊन त्यांची भेट घेतली. (nquired about health over phone )


उपचारासाठी ब्रिज कँडी रुग्णालयात : मंगळवारी धनंजय मुंडे आपल्या मतदारसंघातून परळी येथे असलेल्या निवासस्थानी जात असताना रात्रीच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला अपघात भीषण होता. ( treatment at Breach Candy Hospital ) मात्र अपघात झाल्या क्षणी एअर बॅग उघडल्यामुळे धनंजय मुंडे यांना जास्त मार लागलेला नाही. मात्र या अपघातात त्यांच्या छातीला फटका बसल्यामुळे छाती खालील बरगड्यांमध्ये फ्रॅक्चर झाला असल्यास निष्पन्न झाला आहे. त्याच्यात उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. (Dhananjay Munde health)

कार्यकर्त्यांकडून देखील विश्रांतीचा सल्ला :धनंजय मुंडे यांच्या गाडीला रात्री तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला, मात्र याची माहिती आज सकाळपर्यंत फारशी कुणाला नव्हती. आज सकाळी अपघाताची बातमी शहरभर पसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय अन् तरुण नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. तर सध्या भाजपातील नेत्या पंकजा मुंडे यांचे ते चुलत भाऊ आहेत.


अपघात टाळावा यासाठी अजित पवारांनी दिला सल्ला : गेल्या काही महिन्यात सातत्याने महाराष्ट्रातील नेत्यांच्या गाडीच्या अपघाताचे प्रकार वाढत आहेत. चार महिन्यापूर्वी विनायक मेटे यांनी कार अपघातात आपला जीव गमावला. त्यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना गाडी सावकाश चालवण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच शक्यतो गाडीतून प्रवास करत असताना ड्रायव्हर सोबत असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं यासोबतच मध्यरात्री गाडी चालवणे कटाक्षाने टाळले पाहिजे असा सल्ला अजित पवार यांनी सर्व नेत्यांना दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details