महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Crop Insurance Farmer : आनंदाची बातमी; दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये पीक विमा होणार वितरित - धनंजय मुंडे - Dhananjay Munde On Crop Insurance Farmer

Crop Insurance Farmer : राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी (Diwali) अग्रीम पीक विमा रक्कम (Agrim Pik Vima) मिळणार आहे. भारतीय पीक विमा कंपनीकडून संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पाठपुरावा केला होता.

Dhananjay Munde
मंत्री धनंजय मुंडे

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 4:24 PM IST

Updated : Nov 8, 2023, 9:28 PM IST

माहिती देताना मंत्री धनंजय मुंडे

बीड Crop Insurance Farmer: राज्यातील जवळपास सुमारे 35 लाख शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर गोड बातमी दिली आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम (Agrim Pik Vima) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.


पीकविमा देण्याबाबत दिले आदेश : अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्य स्तरावर अपील केले होते. अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केलं आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

पीकविमा कंपन्यांची घेतली बैठक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीकविमा कंपन्यांची धनंजय मुंडे यांनी बैठक घेऊन, अग्रीमचा तिढा तातडीने सोडवण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेही विम्याबाबत सातत्याने आग्रही होते. या सर्वांचेच धनंजय मुंडे यांनी आभार मानलं आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना केल्या आहेत.



  • कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?

    नाशिक - शेतकरी लाभार्थी - 3 लाख 50 हजार (रक्कम - 155.74 कोटी)

    जळगाव - 16,921 (रक्कम - 4 कोटी 88 लाख)

    अहमदनगर - 2,31,831 (रक्कम - 160 कोटी 28 लाख)

    सोलापूर - 1,82,534 (रक्कम - 111 कोटी 41 लाख)

    सातारा - 40,406 (रक्कम - 6 कोटी 74 लाख)

    सांगली - 98,372 (रक्कम - 22 कोटी 4 लाख)

    बीड - 7,70,574 (रक्कम - 241 कोटी 21 लाख)

    बुलडाणा - 36,358 (रक्कम - 18 कोटी 39 लाख)

    धाराशिव - 4,98,720 (रक्कम - 218 कोटी 85 लाख)

    अकोला - 1,77,253 (रक्कम - 97 कोटी 29 लाख)

    कोल्हापूर - 228 (रक्कम - 13 लाख)

    जालना - 3,70,625 (रक्कम - 160 कोटी 48 लाख)

    परभणी - 4,41,970 (रक्कम - 206 कोटी 11 लाख)

    नागपूर - 63,422 (रक्कम - 52 कोटी 21 लाख)

    लातूर - 2,19,535 (रक्कम - 244 कोटी 87 लाख)

    अमरावती - 10,265 (रक्कम - 8 लाख)

    एकूण - लाभार्थी शेतकरी संख्या - 35,08,303 (मंजूर रक्कम - 1700 कोटी 73 लाख)

हेही वाचा -

  1. Extension Of Crop Insurance : एक रुपयात पिक विमा अर्ज भरण्याची मुदत वाढवली
  2. Monsoon Session 2023: शेतकरी पिक विमा योजना राज्याला तारक - कृषी मंत्री मुंडे
  3. Extension Of Crop Insurance : एक रुपयात पिक विमा अर्ज भरण्याची मुदत वाढवली
Last Updated : Nov 8, 2023, 9:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details