मुंबई - आरेच्या मुद्यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचे नाव बदलून 'यु-टर्न' ठाकरे ठेवायला हवे, असे म्हणत मुडेंनी ठाकरेंना टोला लगावला. सत्तेपुढे लाचार होत सगळ्याच मुद्यावर ते यु-टर्न घेत असल्याचे मुंडे म्हणाले.
आरे कॉलनीतील झाडांच्या खून्यांना सरकार आल्यावर पाहून घेऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आरे कॉलनीच्या मुद्याकडे लक्ष देणार असल्याचे ठाकरे म्हणाले होते. याच मुद्यावरून धनंजय मुंडेनी त्यांना लक्ष्य केले आहे.