महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या तोंडावर ऊसतोड महामंडळाची स्थापना म्हणजे लबाडा घरचं आवतन - धनंजय मुंडे - ऊसतोड महामंडळाची स्थापना

निवडणुकीच्या तोंडावर ऊसतोड महामंडळाची स्थापना म्हणजे लबाडा घरचं आवतन असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर सरकार ऊसतोड कामगारांना गाजर दाखवत फसवणूक करत असल्याचेही मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे

By

Published : Sep 14, 2019, 8:33 AM IST

मुंबई - आचारसंहिता लागू होण्यासाठी काही तासांचा अवधी असताना सरकारने आज ऊसतोड महामंडळाची स्थापना केली आहे. ५ वर्ष मागणी करत असताना सरकारला जाग आली नाही. निवडणुकीच्या तोंडावर सरकार ऊसतोड कामगारांना गाजर दाखवत फसवणूक करत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ५ वर्ष मागणी करत असताना निवडणुकीच्या तोंडावर या महामंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये नियम, अधिकारक्षेत्र कोणत्याही गोष्टी निश्चित नाहीत. हे लबाडा घरचं आवतन आहे. सरकारने निवडणुकांच्या तोंडावर ऊसतोड कामगारांना गाजर दाखवल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details