महाराष्ट्र

maharashtra

डी. के. शिवकुमार यांच्यावर ईडीकडून सुडबुद्धीने कारवाई - धनंजय मुंडे

कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांच्यावर ईडीने सुडबुद्धीने कारवाई केली आहे. सरकारकडून विरोधी पक्षांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

By

Published : Sep 4, 2019, 4:53 PM IST

Published : Sep 4, 2019, 4:53 PM IST

धनंजय मुंडे

मुंबई - कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांच्यावर ईडीने सुडबुद्धीने कारवाई केली आहे. सरकारकडून विरोधी पक्षांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. परिस्थिती बदलेल तेव्हा नोटाबंदी, पिकविमा, कर्जमाफी, जलयुक्त शिवाराच्या भ्रष्टाचाराचे आरोपी आधी आत जातील असेही मुंडे यावेळी म्हणाले.

कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार शिवकुमार 30 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा ईडीसमोर हजर झाले होते. या चौकशीसाठी ते बंगळुरूवरून दिल्लीत आले होते. त्यांनी चौकशीत सहकार्य करणार असल्याचे देखील सांगितले होते. चौकशी आधी ईडीच्या समन्सला आव्हान देणारी याचिका शिवकुमार यांनी दाखल केली होती. पण कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले होते.

काय आहे प्रकरण -
2017 च्या गुजरातच्या राज्यसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे राजकीय हेतूने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला आहे. ईडीने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शिवकुमार आणि दिल्लीतील कर्नाटक भवनमधील एका अधिकाऱ्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण आयकर विभागाद्वारे शिवकुमार यांनी गेल्या वर्षी दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारावर आहे. बंगळूरूतील एका विशेष न्यायालयात हा खटला सुरू असून, शिवकुमार यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details